: मुरगूडमध्ये तालुकास्तरीय मेळावा
मुरगूड : शिक्षण क्षेत्रामध्ये दररोज नवनवीन आव्हाने समोर येत आहेत. सर्व स्तरातून शैक्षणिक विकासासाठी उठाव होण्याची गरज आहे. त्यासाठी व शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघ कटिबध्द आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी केले.
मुरगूड ता. कागल येथील मंडलिक महाविद्यालयाच्या सभागृहात कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी बैठक व कागल तालुका मुख्याध्यापक संपर्क सभा नुकतीच झाली. या सभेत अध्यक्षस्थानावरून सुरेश संकपाळ बोलत होते.
प्रास्ताविक चेअरमन बी. आर. बुगडे यांनी केले. यावेळी नूतन कौन्सिल सदस्य व विविध पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. तसेच साहित्यिक पाच पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल जीवन साळोखे यांचा सत्कार मुख्याध्यापक संघाचे सचिव डी. बी. पाटील म्हणाले, संघाचा पारदर्शी व काटकसरीने कारभार सुरू आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून गुणवत्ता वाढीसाठी व शैक्षणिक सांघिक प्रश्न सोडविण्याची जबाबदारी संघ पार पाडेल, असा आत्मविश्वास वाटतो.
व्हाईस चेअरमन मिलिंद पांगीरेकर,जॉईंट सेक्रेटरी अजित रणदिवे, संपर्क प्रमुख अशोक हुबळे उपस्थित होते. मुरगूड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळ:-
मुरगूड येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संपर्क सभेत बोलताना चेअरमन सुरेश संकपाळ. व्यासपीठावर संघाचे व्हाईस चेअरमन, सचिव व अन्य पदाधिकारी.