पाणी नागरी वस्तीत शिरल्याने जांभूळखोरा वसाहतीमधील नागरिक मात्र भयभीत झाले आहेत. चरीतील पाणी विनाअडथळा तलावामध्ये येण्यासाठी पावसाळ्याअगोदर पालिका प्रशासन व तलाव प्रशासनाकडून या चरीची स्वच्छता केली जाते. पण यावर्षी मात्र या चरीची स्वच्छता केली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
गुरुवारी सकाळी या चरीला दोन ते तीन ठिकाणी मोठी भगदाडे पडली. त्यातून प्रचंड वेगाने पाणी नागरी वस्तीत शिरत होते. सुमारे पन्नासहून अधिक नागरिक आणि पालिकेचे कर्मचारी यांनी युद्धपातळीवर ही भगदाडे मुजवण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी चर फुटली होती तिथे पालिकेने वाळू पोती टाकून बांध तयार केला आहे. या चरीत अवचितवाडी तलावाचे पाणी मिसळत असल्याने पाणीची पातळी वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी ही चर फुटून नागरी वस्तीत पाणी शिरले होते. त्यामुळे पालिका प्रशासन आणि तलाव प्रशासन यांनी कायमस्वरूपी यावर उपाय काढावा, अशी मागणी या वस्तीतील नागरिकांनी केली आहे.
फोटो : २२ मुरगूड तलाव
ओळ :-
मुरगूड (ता. कागल) येथील जांभूळखोरा वसाहतीमधून गेलेल्या चरीची भगदाडे स्थानिक नागरिक आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुजविली.