कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वातील नावनोंदणीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी शनिवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ होणार आहे. त्यामध्ये आरोग्यविषयक सल्ला मिळणार आहे.या सभागृहात सकाळी दहा वाजता धावपटूंसाठी एक्स्पो सुरू होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता त्याचे उद्घाटन होईल. फिजिओथेरपिस्ट, आयर्नमन यांच्या गप्पा, त्यांचे अनुभव कथन आणि त्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. त्यानंतर महामॅरेथॉनमध्ये धावण्याविषयी पेसर हे मार्गदर्शन करणार आहेत.
एक्स्पोच्या अखेरच्या सत्रात रविवारी (दि. ५ जानेवारी) पहाटे होणाऱ्या स्पर्धेबद्दल आणि नियमावलीची माहिती दिली जाणार आहे. सायंकाळी सात वाजता ‘बीब एक्स्पो’चा समारोप होणार आहे. या एक्स्पोमध्ये महामॅरेथॉनमधील विविध पाच गटांमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना टी-शर्ट, बीब (चेस्ट नंबर आणि गुडी बॅग दिली जाणार आहे.टी-शर्ट, बीब मिळविण्यासाठी हे आवश्यकज्या स्पर्धकांनी महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी केली आहे. त्यांनी टी-शर्ट, बीब आणि गुडी बॅग मिळविण्यासाठी त्यांच्या अथवा नोंदणीवेळी दिलेल्या मोबाईलवर आलेले एसएमएस, ई-मेल्स किंवा सभासद नोंदणी शुल्काची पावती सोबत आणावी लागणार आहे. सोबत आयडेंटिटी फोटो असावा. जे स्पर्धक स्वत: येऊन हे साहित्य घेऊ शकणार नाहीत, त्यांनी मित्र, नातेवाइकांकडे आॅथॉरिटी लेटर, रिसिट, ई-मेल्स पाठवून द्यावे; तर ते साहित्य त्यांना देण्यात येईल.धावपटूंना ओळखण्यासाठी ‘बीब’ क्रमांक‘बीब’ म्हणजे धावपटू छातीवर लावतात तो कापडी फलक, कुठल्याही शर्यतीत ‘बीब’ हा आत्मा मानला जातो. धावपटूंना ओळखण्यासाठी बीब क्रमांकाचा वापर होतो.
‘लोकमत महामॅरेथॉन’च्या माध्यमातून आरोग्याबाबतची एक चांगली चळवळ कोल्हापूरमध्ये सुरूझाली आहे. या महामॅरेथॉनद्वारे सदृढ आरोग्य आणि पर्यावरणरक्षण, संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जातो. महामॅरेथॉनच्या या आरोग्यदायी उपक्रमामध्ये कोल्हापूरसह परिसरातील सर्व धावपटू, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. शिवाजी विद्यापीठदेखील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविते. त्याद्वारे त्यांच्यामध्ये सदृढ आरोग्याबाबतचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये गेले साडेचार वर्षांपासून रोज योगाचे वर्ग विद्यापीठात घेण्यात येत आहेत. वर्षातून दोनवेळा शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी केली जाते.-डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ
‘विद्याप्रबोधिनी’ महामॅरेथॉनमध्ये सहभागी सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याबाबत सजग करण्याचे काम ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या माध्यमातून होत आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन सदृढ आरोग्याची प्रेरणा घेऊन अथवा प्रभावित होऊन अनेकांनी व्यायामाची सुरुवात केली. त्याचा त्यांना आरोग्याच्यादृष्टीने निश्चितपणे लाभ होत आहे.‘लोकमत’ महामॅरेथॉनच्या आरोग्यादायी उपक्रमामध्ये यावर्षीही विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सहभागी झाले आहे. ‘विद्याप्रबोधिनी’ सन २००१ पासून एमपीएससी, युपीएससी, बँकिंग, एमबीए आणि रोजगार मार्गदर्शन याबाबत अत्यंत माफक शुल्कात कोल्हापूर जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी देशभर असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहे.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ‘विद्याप्रबोधिनी’ आशादायी ठरत आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी, सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ‘विद्या प्रबोधिनी’तील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक मार्गदर्शनासह त्यांनी ताणमुक्त राहून परीक्षा द्यावी. त्यांच्या मनाची एकाग्रता राहण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. प्रेरणादायी वक्ते, तज्ज्ञ, समुपदेशकांद्वारे मार्गदर्शन केले जाते. योगा, प्राणायाम करून घेतले जाते.-राहुल चिकोडे, अध्यक्ष, विद्या प्रबोधिनी कोल्हापूर.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. रोज सकाळी अथवा सायंकाळी वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीने चालायला, धावायला पाहिजे; त्यामुळे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होईल. मी स्वत: योगासन, चालणे यांसारख्या व्यायामाच्या गोष्टींना महत्त्व देतो. ‘लोकमत’ महाराष्ट्रभर राबवीत असलेल्या ‘संस्काराचे मोती’ या शालेय उपक्रमात सुराज्य फौंडेशनने सन २०१० मध्ये सहभाग नोंदविला होता. सुराज्य फौंडेशन राबवीत असलेल्या यूपीएससी परीक्षेतील आयएएस गुणवंतांचा व्हिजन-गौरव सोहळा या उपक्रमाच्या कार्याची व्याप्ती देशपातळीवर पोहोचली आहे. ‘लोकमत’ने नवीन वर्षाच्या प्रारंभीच महामॅरेथॉनसारखा उपक्रम कोल्हापूरनगरीमध्ये घेऊन सर्वांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. खरोखरच हा उपक्रम स्तुत्य आहे.- एन. एच. पाटील,अध्यक्ष, तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती संस्था आणि सुराज्य फौंडेशन वारणानगर
वारणानगरीला मोठी क्रीडा परंपरा आहे. सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या माध्यमांतून सुमारे पन्नास वर्षांपूर्वी क्रीडा क्षेत्राला गती देण्याचे काम केले. या समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, वारणा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू, विद्यार्थी, नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. ‘लोकमत’च्या अनेक उपक्रमांमध्ये वारणा समूहाने सहभाग नोंदविला आहे. वारणा महाविद्यालय, कोरे इंजिनिअरिंग कॉलेज, बी-फार्मसी कॉलेज, विद्यालय, विद्यामंदिर, सैनिकी शाळा, इंग्लिश स्कूल अशा अनेक शिक्षण संस्थांमार्फत विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू, शिक्षक, महिला, कर्मचारी यांच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम, योजना सुरू केल्या आहेत. ‘लोकमत’ने ५ जानेवारी रोजी कोल्हापूरवासीयांसाठी आयोजित केलेल्या महामॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.- डॉ. वासंती रासम, प्रशासकीय अधिकारी, वारणा विभाग शिक्षण मंडळ.
सध्याच्या धावपळी आणि तणावाच्या जीवनशैलीमध्ये आपले शरीर फिट असणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. निरोगी शरीरासाठी रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. धावणे हा सर्वांत चांगला व्यायाम असून, मी आणि माझे कुटुंब रोज मॉर्निंग वॉक करतो. ‘लोकमत’च्या पहिल्या महामॅरेथॉनपासून आम्ही त्यामध्ये आहोत. या महामॅरेथॉनचे नियोजन अत्यंत चांगले असते. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होणार आहोत. आरोग्याचा खूप चांगला मंत्र मला ‘लोकमत’मुळे मिळाला आहे.-शंकर दुल्हानी, सरस्वती साडी डेपो, कोल्हापूर.
प्रत्येकाने व्यायाम हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनविणे आवश्यक आहे. व्यायामाची सवय सर्व कुटुंबाला होणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी नववर्षात व्यायामाची सुरुवात करण्याची संधी ‘लोकमत महामॅरेथॉन’द्वारे उपलब्ध झाली आहे. या महामॅरेथॉनचे नियोजन अचूक आणि मन भारावून टाकणारे असते.- मगन पटेल, जनसंपर्क अधिकारी, पाटीदार समाज कोल्हापूर
यावर्षीचे मेडल ठरणार संस्मरणीयउद्दिष्ट साध्य केल्यानंतर दिले जाणारे मेडल हे धावपटूंसाठी नेहमीच संस्मरणीय ठरते आणि यावर्षीचे मेडल तर सहभागी होणाऱ्यांसाठी आणखीनच संस्मरणीय ठरणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी ‘क्रॉस द लाईन’ पार करणाºया धावपटूंना रंगीत असे आकर्षक मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.