शित्तूर-वारुण : शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथे शनिवारी लोकराज्य युवाशक्ती फाउंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचे उद्घाटन सरपंच नीता पाटील व उपसरपंच लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे ३०० पेक्षा अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात १३० रुग्णांची रक्त तपासणी, तर सुमारे १५० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
डॉ. सतीश करालकर यांच्या वैद्यकीय पथकाने या आरोग्य शिबिराचे काम पाहिले. यावेळी सरपंच नीता पाटील, उपसरपंच लक्ष्मण पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. क्रांतिसिंह सातपुते, संस्थेचे महासचिव अजित खरोशे, मनोज पाटील, राजेंद्र नांगरे, मोहन महिंदकर, राहुल कासार आदी उपस्थित होते.