कोल्हापूर : येथील पंचाचार्य होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्यात आला. हा दिवस या उपचार पद्धतीचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमान यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
महाविद्यालयातर्फे रुक्मिणी नगरातील संजीवनी रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. रवीकुमार जाधव यांच्याहस्ते व डॉ. हनिमान यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी डॉ. रवीकुमार जाधव यांनी या चिकित्सा पद्धतीचा जन्म जर्मनमध्ये झाला असला, तरी ती भारतात खूप लोकप्रिय आहे व आता रुग्ण मोठ्या संख्येने या उपचार पद्धतीकडे वळत असल्याचे सांगितले.
डॉ. संतोष रानडे यांनी कोरोनामुळे विलगीकरण केलेले, लक्षणे नसलेल्या व असलेल्या रुग्णांसाठी होमिओपॅथिक औषधे उपलब्ध असल्याचे सांगितले. डॉ. रूपाली पाटील यंनी शिबिर ३० एप्रिलपर्यंत सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. राजकुमार पाटील, डॉ. सुहास पाटील, डॉ. मिलिंद गायकवाड, डॉ. दीपाली पाटील, डॉ. दीपक लडगे, श्रुती स्वामी उपस्थित होत्या.
--