प्रास्ताविक संचालक एम. के. चौगले यांनी, तर अहवाल वाचन संस्था अध्यक्ष प्रार्थना शेलार यांनी केले. या सभेत १३.५ टक्के लाभांश व कर्जावरील व्याजदर कमी करून १० टक्के करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. विषय वाचन व्यवस्थापक महेंद्र पांडव यांनी केले. यावेळी संचालक अनिल खटावकर, विजयकुमार खांडेकर, धनाजी जाधव, महेश मुळे, अमाेल भोसले, अंजली देवकर, संगीता आळतेकर, संस्थापक एम. एस.पाटील, व माजी अध्यक्ष दिलीप ठोंबरे आदी उपस्थित होते. सभासद योगेश यादव, अमित भोसले, जयदीप पाटील, भरत शिंदे यांनी सहभाग घेतला. संस्थेचे उपाध्यक्ष मारुती पाटील यांनी आभार मानले.
हिंदी राष्ट्रीय निबंध स्पर्धेत पूजा देवणेचे यश
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी काॅलेज, सातारा व महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे
संचलित कोल्हापूर विभागीय समितीच्यावतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन निबंध लेखन स्पर्धेत कोल्हापूरच्या न्यू काॅलेजच्या कला शाखेत शिकणाऱ्या पूजा सखाराम देवणे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. तिला प्राचार्य डाॅ. व्ही. एम. पाटील, हिंदी विभागप्रमुख प्रा. अविनाश पाटील, प्रा. स्मिता वणिरे, प्रा. सागर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. फोटो : २२०३२०२१-कोल-पूजा देवणे