संतोष बामणे -जयसिंगपूर -जिल्ह्यातील काळम्मावाडी व राधानगरी धरणाच्या पुनवर्सनासाठी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत पुनर्वसन केलेल्या वसाहती आहेत. याठिकाणी शासनाच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र, उदगाव (ता. शिरोळ) येथील काळम्मावाडी पुनर्वसन वसाहतीसाठी सर्व सोयींनीयुक्त प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारले असून, नागरिकांना आता आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत. अशी सुविधा मिळणारी जिल्ह्यातील पहिलीच वसाहत ठरली आहे. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उदगाव येथे आरोग्य उपकेंद्र अ व ब अशी दोन उपकेंदे्र असून ‘अ’ हे उपकेंद्र उदगाव येथील १४ हजार उनागरिकांसाठी उपयुक्त असून ‘ब’ हे उपकेंद्र काळम्मावाडी, चिंचवाड, उदगावमधील काही उपनगरांसाठी उभारण्यात आले आहे. या उपकेंद्रात १२ हजार नागरिकांच्या आरोग्याची सोय करण्यात आली आहे. सध्या अ व ब ही उपकेंद्रे उदगाव येथील एस.टी. स्थानकाजवळच होती. त्यामुळे यातील ब हे उपकेंद्र चिंचवाड किंवा काळम्मावाडी वसाहतीत हलविण्याची मागणी नागरिकांतून होत होती. यामागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक यांनी पुढाकार घेऊन आरोग्य विभागाकडून धरणग्रस्त वसाहतीत ‘ब’ हे आरोग्य केंद्र हलविण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार याठिकाणी सुसज्ज अशी ४८ लाख रुपये खर्चाच्या दुमजली इमारतीत उपकेंद्र लवकरच सेवेत येणार आहे.‘ब’ या उपकेंद्राकडे नंदीवाले वसाहत, सांखळे मळा, अवचितनगर, महावीर कॉलनी, चिंचवाड या वसाहतीतील ग्रामस्थांना सेवा मिळणार आहे. जयसिंगपूर येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र, जयसिंगपूर येथील ग्रामीण रुग्णालयासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे हा प्रश्न अधांतरी आहे. हा प्रश्न मिटल्यानंतर जयसिंगपूर येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे हलविण्यात येणार आहे. त्यासाठी उदगाव येथे जागाही आरक्षित केली आहे. त्यामुळे उदगाव येथील अ हे उपकेंद्र चिंचवाड येथे हलविण्यात येणार असल्याचे समजते. येथे बस किंवा रिक्षाची सोय नसल्यामुळे आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, या उपकेंद्रामुळे धरणग्रस्त वसाहतीमधील गरोदर महिलांची तपासणी व प्रसूतीसाठी सोयीस्कर बनले आहे.- स्वाती पाटील, सरपंच उदगावउदगाव येथील काळम्मावाडी वसाहत येथे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. धरणग्रस्तांसाठीचे जिल्ह्यातील पहिलेच उपकेंद्र असून, येथील नागरिकांना आता आरोग्य सुविधा मिळणार आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसाद दातार यांनी दिली.
काळम्मावाडी वसाहतीसाठी आरोग्य उपकेंद्र
By admin | Published: September 23, 2015 11:40 PM