लवंगाचं तेल
दाताचे दुखणे कमी करण्यासाठी लवंग अथवा लवंगाचे तेल फायदेशीर आहे. दात दुखत असल्यास १०-१५ मिनिटासाठी लवंग दाताखाली पकडा अथवा जेथे दुखत आहे तेथे लवंगाचे तेल इअर बर्डच्या साह्याने हळूवार लावा. हे केल्यानंतर १५ ते २० मिनिटे जेवण अथवा पाणी पिऊ नका. हे केल्याने तुमची दात दुखी कमी होईल.
मीठाचं पाणी
तुम्ही मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता. यामुळे तोंडातील जीवाणू नष्ट होतील आणि तोंडाला आलेली सूज ही कमी होईल.
मीठ आणि हळदीचं पाणी
तुम्ही एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. तुमच्या तोंडातील जीवाणू बाहेर टाकले जातील. हळद अँटीइन्फ्लेमेंटरी आणि अँटिबॅक्टेरियल गुणांनी समृद्ध असते. याचा तुम्हाला फायदाच होतो.
बर्फाने शेका
तुम्ही दाताचे दुखणे कमी करण्यासाठी बर्फाने शेकू शकता. यामुळे दाताचे दुखणे कमी होईल.
पेपरमिंट टी बॅग
थंड पेपरमिंट टी बॅगमध्ये मेन्थॉलचे गुण असतात जे दाताचा त्रास कमी करतात. ज्या भागात दात दुखत आहेत त्या भागात भिजवलेल्या थंड पेपरमिंट टी बॅग १० ते १५ मिनिटे ठेवा.
080721\08kol_1_08072021_5.jpg
दाताचे दुखणे