शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांची सुनावणी सुरू

By admin | Published: September 08, 2015 12:27 AM

प्रशासन आक्रमक : एका महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे नियोजन; पात्रांनाच मिळणार लाभ

कोल्हापूर : गरीब, दुर्बल, कमकुवत लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय, विशेष साहाय्य विभागाकडून दर महिन्याच्या आर्थिक मदतीसाठी निवडलेल्या लाभार्थ्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत बोगस ठरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील १७,५४४ लाभार्थ्यांची शासनाच्या आदेशानुसार तालुका पातळीवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, एका महिन्यात सुनावणी पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना पुन्हा अनुदान सुरू केले जाणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ, राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ, आम आदमी विमा या योजना आहेत. जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी (महसूल), तर गावपातळीवर तलाठ्यांतर्फे या योजनांची अंमलबजावणी होते. पात्र लाभार्थी निवडीसाठी तालुका स्तरावर समिती असते. परंतु, समितीमधील अशासकीय सदस्य आणि स्थानिक प्रभावशाली लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे या योजनांत अपात्र लाभार्थी घुसडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लाभार्थ्यांची चौकशी केली. यामध्ये विविध योजनांच्या ९८,६१८ लाभार्थ्यांपैकी १७,५४४ लाभार्थी बोगस असल्याचे स्पष्ट झाले. सर्वाधिक बोगस लाभार्थी कागल तालुक्यात मिळाली. यावरून सत्ताधारी आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत कागलमध्ये भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यामुळे प्रशासनावर दबावतंत्राचा वापर वाढला. गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बोगस लाभार्थी किती आहेत, त्याचे काय होणार, विरोधकांचे राजकारण, याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यामुळे सध्या बोगस लाभार्थींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोगस लाभार्र्थ्यांंची सुनावणी तालुका पातळीवर सुरू आहे. कितीही दबाव आला तरी अपात्र लोकांना लाभ द्यायचा नाही, असा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्यामुळे पुढील एका महिन्यात अपात्र लाभार्थींची सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थींना पूर्ववत लाभ सुरू करण्यात येणार आहे. बोगस लाभार्थी तालुकानिहाय असे कोल्हापूर उत्तर - २०८, कोल्हापूर दक्षिण - ३५११, करवीर - ३१०९, कागल - ३६२५, पन्हाळा - ३८९, शाहूवाडी - १०३, हातकणंगले - १२१९, इचलकरंजी शहर -४१०, शिरोळ - ४१०, शिरोळ - ६३०, राधानगरी - ६३०, राधानगरी - २२०, भुदरगड -२८७२, गगनबावडा - ५०, गडहिंग्लज - ६८४, आजरा - ३२५, चंदगड - १८९.शासनाच्या १ आॅगस्ट २०१५ च्या आदेशानुसार अपात्र लाभार्थ्यांंची सुनावणी घेण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत. सुनावणी एक महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, सुनावणीत पात्र ठरल्यास संबंधित लाभार्थ्यांचे लाभ पूर्ववत सुरू होतील. - किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल).