शहरात दुपारी ४ नंतर ‘श्रीं’च्या विसर्जनाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी ‘श्रीं’चे विसर्जन केले. दरम्यान, नदीपात्रात विसर्जन करण्याऐवजी नागरिकांनी पालिकेतर्फे त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या कुंडातच ‘श्रीं’चे विसर्जन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त होता.
शहरात विविध २२ ठिकाणी पालिकेतर्फे गणपती विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडाची सोय केली होती. त्यास भाविकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शहरातील २२ कुंडामध्ये दुपारी २ पर्यंत २५ ‘श्रीं’चे, दुपारी ४ पर्यंत ६१८, तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७६० ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन झाले होते. यामध्ये प्लास्टरच्या ४१९, तर शाडूच्या ३४१ मूर्तींचा समावेश होता.
-----------------------
नेसरीमध्ये कृत्रिम कुंडात विसर्जन
नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) परिसरात नागरिकांनी घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन केले. पारंपरिक पद्धतींना फाटा देत यावेळी १०० हून अधिक नागरिकांनी कृत्रिम कुंडातच ‘श्रीं’चे विसर्जन करून निर्माल्य दान केले. नेसरी ग्रामपंचायतीतर्फे बसस्टँड व रवळनाथ मंदिराजवळ कृत्रिम कुंडाची सोय केली होती.
यासाठी सरपंच आशिष साखरे, उपसरपंच अमर हिडदुगी, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, वाचन मंदिरचे कार्यवाह वसंतराव पाटील, पवन पाटील, सोमनाथ तेली, अशोक गुरव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-----------------------
फोटो ओळी : (किल्लेदार फोटो)
बाप्पा चालले आपुल्या गावा..!
गडहिंग्लज शहरात पारंपरिक पद्धतीने ‘श्रीं’ना डोक्यावर घेऊन विसर्जनासाठी चाललेले भाविक.
क्रमांक : १४०९२०२१-गड-०९
-----------------------
गडहिंग्लज येथील हिरण्यकेशी नदी घाटावर पालिकेतर्फे ठेवण्यात आलेल्या कुंडात ‘श्रीं’चे विसर्जन करताना भाविक.
क्रमांक : १४०९२०२१-गड-१०
-----------------------
गडहिंग्लज येथील हिरण्यकेशी नदी घाटावर ‘श्रीं’च्या विसर्जनानिमित्त ठेवण्यात आलेला पोलीस बंदोबस्त.
क्रमांक : १४०९२०२१-गड-११
-----------------------
गडहिंग्लज शहरातील गांधीनगर परिसरातील कुंडात नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी आपल्या ‘श्रीं’चे विसर्जन केले.
क्रमांक : १४०९२०२१-गड-१३
-----------------------
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे रवळनाथ मंदिराजवळील कृत्रिम कुंडात ‘श्रीं’चे विसर्जन करताना सरपंच आशिष साखरे, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, वसंतराव पाटील, पवन पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : १४०९२०२१-गड-१२