विनोद सावंत कोल्हापूर : पोस्ट पेमेंट बँकेमध्ये कोल्हापूर हे पोस्ट पेमेंट बँक सेव्हिंग खाती उघडण्यात राज्यात आघाडीवर आहे. चालू आर्थिक वर्षात एक लाख ४२ हजार ६६४ बचत खाती नव्याने सुरू झाली आहेत. तीन दिवसांत ३० हजार ६२३ ग्राहकांनी खाती सुरू केली. यामुळे ही बँक राज्यातील पोस्ट बँकेमधील सर्वाधिक बचत खाती उघडणारी बँक ठरली आहे.केंद्र शासन आणि रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुविधा तळगाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पेमेंट बँकांना परवानगी दिली. यात पोस्ट खात्यालाही पेमेंट बँक देण्यात आली. देशात पोस्ट खात्याबाबत विश्वासार्हता आहे. त्यामुळे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बचत, चालू खाते उघडण्यासाठी गर्दी होत आहे. दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या पोस्ट पेमेंट बँकेकडे ग्राहकांचा कल आहे. कोल्हापुरातील पोस्ट पेमेंट बँकेने राज्यातील पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आघाडी घेतली आहे. आर्थिक वर्षात सर्वाधिक बचत खाते उघडणारी ही पोस्ट बँक ठरली आहे.>राज्यातील प्रमुख पोस्ट बँकेतीलबचत खात्यांची स्थितीजिल्हा बचत खातीकोल्हापूर १ लाख ४२ हजार ६६४मुंबई-गिरगाव शाखा ८९ हजार १८०सांगली ८१ हजार ३८४मालेगाव कॅम्प ७४ हजार ५८५जळगाव ७१ हजार ३६सातारा ६७ हजार ५३०नांदेड ६७ हजार ३८३औरंगाबाद ६४ हजार ९४४मुंबई अंधेरी शाखा ५६ हजार ८४४अमरावती मुख्य कार्यालय ५५ हजार ८६८नागपूर शाखा ५४ हजार ६२४अकोला ५२ हजार ४४७बुलढाणा ५१ हजार ४६६रत्नागिरी ५१ हजार १७६यवतमाळ ४९ हजार ३८०ठाणे ४७ हजार ३०७चंद्रपूर ४१ हजार २६५उस्मानाबाद ३८ हजार ६४०> पोस्ट पेमेंट बँक सुरू १ सप्टेंबर २०१८जिल्ह्यात एकूण पोस्ट कार्यालये ५६३पोस्ट पेमेंट बँक ५३७बचत खाती संख्या २ लाख २५ हजार ११५
पोस्ट पेमेंट बँकेत ‘कोल्हापूर’ राज्यात भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 4:36 AM