लोकमत न्यूज नेटवर्कहातकणंगले : हातकणंगले, आळते, धुळोबा व रामलिंग डोंगर परिसरामध्ये रविवारी सायंकाळी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतीची दाणादाण उडाली असून, पिके वाहून गेली आहेत. बंधारे फुटल्यामुळे शेतकरी भयभीत झाले. अचानक सुरू झालेल्या या पावसाने एकच हाहाकार उडाला.रविवारी दुपारी चार वाजल्यापासून हातकणंगले तालुक्यातील काही गावात विजेच्या कडकडासह पावसाने चांगलेच झोडपून काढले, तर आळते परिसरात ढगफुटीसदृश पावसाने सुमारे दोन तासांत चांगलाच हाहाकार माजविला. शेतकºयांनी कापून ठेवलेले सोयाबीन, भुईमूग या पावसाने वाहून गेले.तालुक्यातील हातकणंगले, आळते, कुंभोज, पेठवडगाव, अतिग्रे, रुकडी, हेरले, शिरोली, हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली, रांगोळी, आदी परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चालू झालेल्या पावसाची संततधार रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आळते परिसरात बांधावरील रचलेली पिके वाहून गेली. रामलिंग परिसरात दरड कोसळण्याचे प्रकार घडले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पावसाने कित्येक वर्षांनी बिरेदवाडी येथील लक्ष्मी तलाव ओसंडून वाहत आहे.
हातकणंगलेमध्ये अतिवृष्टीने दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:54 AM