सदाशिव मोरेआजरा : आजऱ्यात आज सकाळी ५ ते ९ यावेळेत अतिवृष्टी झाली. यामुळे संभाजी चौक जलमय झाला होता. गुडघाभर पाण्यातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांना कसरत करत ये - जा करावी लागली. या पाण्यातूनच वाहनधारकांनीही ये - जा सुरू केल्यामुळे पाण्याच्या लाटा दुकानांच्या कठड्यावरती आदळत होत्या.प्रत्येक वर्षी आजऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर संभाजी चौक जलमय होतो. पाणी जाण्यासाठी असलेली गटर अरुंद असल्याने हा प्रकार होतो. तालुक्यातील साळगाव बंधारा आजही पाण्याखालीच आहे. चित्री धरणात ४७ टक्के, आंबेओहोळ ५० टक्के, खानापूर ३५ टक्के, एरंडोळ ९१ टक्के, उचंगी ३९ टक्के तर चिकोत्रा ४० टक्के भरला आहे. पावसाने सकाळी साडेनऊ नंतर पूर्ण विश्रांती घेतली आहे.
Kolhapur: आजऱ्यात अतिवृष्टी, संभाजी चौक जलमय; गुडघाभर पाण्यातून विद्यार्थी, नागरिकांची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 12:14 PM