शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

शेतकऱ्यांना दिलासा! कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, रब्बी पेरण्यांना वेग येणार

By राजाराम लोंढे | Published: November 08, 2023 11:57 AM

ऊस पिकांना जीवदान मिळाले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर अधिक असून पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे. ओलीअभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना वेग येणार आहे. रविवार (दि.१२) पर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.यंदा अखंड मान्सूनमध्ये जेमतेम एक महिनाच पाऊस झाला. परतीचा पाऊसही न झाल्याने जमिनीत पाणी नाही. त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी झाले. जमिनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात १५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता.ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळी आठ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढत गेला. सगळीकडे पाणी पाणी झाले असून शिवारात पाणी उभे राहिले आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकाला दिलासा मिळाला असून रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील खोळंबलेल्या रब्बीच्या पेरण्या सुरू होणार आहेत.

सप्टेंबरपासूनच विद्युत पंप सुरू करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. गेली दोन महिने उभ्या उसाला पाणी द्यावे लागत आहे. त्यात आठ तासच वीज मिळते, मात्र पाण्याअभावी जमिनी भेगाळल्यामुळे पाणीच पुढे सरकत नाही. त्यामुळे पाण्याचा फेरच बसत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. बुधवारी करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाने अक्षरश: झोडपून काढले. हातकणंगले तालुक्याच्या काही भागातही चांगला पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे ओली अभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना आता गती येणार आहे.पूर्वेकडील तालुक्यात कमी पाऊसजिल्ह्याच्या पूर्वेकडील काही तालुक्यांत तुलनेत पाऊस कमी झाला आहे. आणखी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा तळ असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वीट व्यावसायिकांची तारांबळअखंड ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नाही आणि कडक उन्हामुळे वीट व्यवसाय जोमात होता. मात्र, अवकाळी पावसाने त्यांची तारांबळ उडाली होती.

गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या धुमू लागल्याजिल्ह्यात गुऱ्हाळ घरांनी वेग पकडला आहे. साखर कारखाने सुरू नसल्याने त्यांचा हंगाम जोरात आहे. अवकाळी पावसाने त्यांचीही तारांबळ उडाली असून जळण भिजल्याने गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या धुमू लागल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस