शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस

By admin | Published: November 16, 2016 12:44 AM

दोन तास झोडपले : नागरिकांची तारांबळ; तारा तुटल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने तब्बल दोन तास तळ ठोकल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना भिजतच घरी जावे लागले. कळंबा, लक्ष्मीपुरी परिसरातील विजेच्या तारा अनेक ठिकाणी तुटल्याने वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. यंदा मान्सून चांगलाच बरसल्यानंतर परतीच्या पावसाने आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच मुक्काम हलविला होता. त्यानंतर बोचऱ्या थंडीने एंट्री केली होती. गेल्या दोन दिवसात थंडीची तीव्रता काहीसी कमी होऊन ढगाळ वातावरण झाले. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता शहरात अचानक पावसाला सुरुवात झाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व कामावरून घरी जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एकसारखा दोन-अडीच तास जोरदार पाऊस राहिल्याने नागरिकांना रस्त्यातच ताटकळतच थांबावे लागले. तर अनेकांना कार्यालयात थांबून पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली. पाऊस थांबत नसल्याने अनेकांनी भिजतच घर गाठले. अचानक आलेल्या पावसाने फेरीवाले, रस्त्यावरील स्टॉलधारकांची पळापळ झाली. पाऊस जोरदार झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा गुऱ्हाळघरे, साखर कारखाने, वीट व्यावसायिकांना फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान वीटभट्ट्यांचे झाले आहे. भाताची सुगी संपली असली तरी नागलीच्या काढणीचे काम सुरू आहे. त्यामध्येही अडथळा निर्माण झाला आहे. कळंबा ते लक्ष्मीपुरी लाईनवरील वीजपुरवठा खंडित संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे कळंबा लक्ष्मीपुरी वीजवाहिनीवरील तारा अनेक ठिकाणी तुटल्याने वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. कळंबा कारागृहाजवळ झाडाची फांदी पडून तार तुटली तर अनेक ठिकाणी क्रॉस तुटले. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महालक्ष्मीनगर तेथुन पुढील भागातही अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करत तुटलेल्या तारा जोडत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एटीएमसमोर गर्दी संध्याकाळी मोठ्या पावसाने एटीएमसमोरील गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, रात्री दहाच्या सुमारास पाऊस पूर्ण बंद झाल्याने नागरिक पुन्हा एटीएमवर गर्दी करू लागले; परंतु अनेक एटीएमवरील पैसे संपल्याने ज्या मोजक्या एटीएममध्ये पैसे शिल्लक होते, तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत दिसत होते. गुऱ्हाळघरे, कारखाने बंद राहणार? जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गुऱ्हाळघरे व साखर कारखान्यांची चिखलातून ऊस वाहतूक चालणार नाही. परिणामी, आज, बुधवारी ऊस तोड काही ठिकाणी बंद राहण्याची शक्यता आहे.