कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. गगनबावडा, करवीर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांचीच तारांबळ उडाली.जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळ पासूनच पावसाची भुरभुर सुरू होती. काही वेळ ऊन पडल्यानंतर पाऊस गेला असे वाटत असताना अचानकच ढग दाटून यायचे आणि पाऊस सुरू व्हायचा. दिवसभरात अनेक वेळा कोल्हापूर शहरात हजेरी लावली.
दुपारी तीन वाजता, गगनबावडा, करवीर, राधानगरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पाऊस रोज हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. साखर कारखान्यांची ऊस तोडणी खोळंबल्या असून रस्त्या लगतचा ऊस तोडणीशिवाय मजूरांकडे पर्याय नाही. गुऱ्हाळघरांचेही मोठे नुकसान झाले आहे.