कोल्हापूर : शहर आणि परिसरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मान्सूनने दमदार हजेरी लावली. अर्धा तास पाऊस झाल्याने हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला. सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील धूळ वाफे केलेल्या आणि उगवून आलेल्या भातपिकास पाऊस पोषक ठरल्याने बळिराजा सुखावला आहे. दरम्यान, पावसामुळे शहरात तारांबळ उडाली. हवामान खात्याने वेळेवर मान्सून सुरू होईल, असा अंदाज सुरुवातीला वर्तविला. त्यामुळे मेच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र धूळ वाफेच्या, तर १ जूनपासून सर्वच पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली. मात्र, मान्सूनची आगेकूच रेंगाळली. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त बनला. पावसाऐवजी उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. रविवारी पहाटेपासून वातावरणात बदल होऊन मान्सून सक्रिय झाला. शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सोमवारी दुपारी तीन वाजता दमदार पावसाला सुरुवात झाली. दुचाकी, पादचारी, फेरीवाल्यांची तारांबळ उडाली. वेळेत पोहोचण्यासाठी काही पादचाऱ्यांनी रिक्षाने जाणे पसंत केले. तब्बल अर्धा तास पाऊस झाला. दुपारनंतर हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला. रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना गती आली आहे. मान्सूनच्या दमदार सरी पडल्याने पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली आहे. रेनकोट, छत्री, ताडपत्री यांंच्या खरेदीसाठी धांदल उडाली. सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात...
पावसाची दमदार हजेरी
By admin | Published: June 16, 2015 12:52 AM