कोल्हापूर: शहर परिसरात आज, सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, जोतिबा रोडवर कारवर भलेमोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत दोघे जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गेल्या आठवडाभर जिल्ह्यात वळीव पाऊस कमी-अधिक प्रमाणात होत आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. सकाळपासूनच वातावरणात उष्मा असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, दुपारी पावसाने वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. तर घरांवरील पत्रे उडाली.दरम्यानच, जोतिबा देवाच्या दर्शनावरून येणाऱ्या भाविकांचा कारवर भलेमोठे झाड कोसळले. यात दोघे भाविक जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याघटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, कारवर झाड कोसळून दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 5:34 PM