कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस कोसळला. दिवसभर एक सारखी रिपरिप सुरु होती, तर गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यात काहीसा धुवांदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २७ फुटावर पोहचली असून विविध नद्यांवरील १५ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.सोमवार पासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी सकाळ पासून तर गगनबावड्यासह शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात संततधार सुरु राहिली. दिवसभर एक सारखा पाऊस सुरु असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.
कोल्हापूर शहरात दिवसभर रिपरिप राहिली असून अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २७ फुटापर्यंत पोहचली असून पंधरा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.