शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

कोल्हापूरला मान्सूनपुर्व पावसाने झोडपले, जोरदार वाऱ्यासह गारांचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 5:51 PM

कोल्हापूर : जोरदार वारे व गारासह आज, गुरुवारी संध्याकाळी आलेल्या मान्सूनपुर्व सरींनी दमदार हजेरी लावली. या पावसाच्या सरीमुळे दिवसभराच्या ...

कोल्हापूर : जोरदार वारे व गारासह आज, गुरुवारी संध्याकाळी आलेल्या मान्सूनपुर्व सरींनी दमदार हजेरी लावली. या पावसाच्या सरीमुळे दिवसभराच्या उष्म्यानंतर सुखद अनुभूती दिली. मात्र, कडकडणाऱ्या विजांच्या थयथयाटाने कोल्हापुरकरांच्या पोटात भीतीचा गोळा आणला. पावसामुळे क्षणार्धात रस्त्यांवरुन पाण्याचे लोट वाहू लागले तर जनजीवन जागच्या जागी स्तब्ध झाले. पावसाचा मारा इतका प्रचंड होता की दाट धुके पडल्यासारखे वातावरण झाले होते.कोल्हापुरात मान्सुनचे आगमन १० जूनपर्यंत लांबले असले तरी काल, बुधवारी संध्याकाळपासून मान्सूनपुर्व सरींचे आगमन झाले आहे. काल, कुठे ढग उतरतील तिथे पाऊस झाला. शहरात किरकोळ सर वगळता मोठ्या पावसाने हुलकावणीच दिली होती. आज, गुरुवारी संध्याकाळी ही सर्व कसर भरुन निघाली.पाचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह वरुणराजाचे आगमन झाले. विजांचा थयथयाट सुरु झाला. सोबत जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. लगेच गाराही पडू लागल्या. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की समोरचे काही दिसतच नव्हते. तासभर पावसाने अक्षरशा धुवून काढले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस