कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून काही होईना पण जोरदार सरी कोसळत आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत राधानगरी, भुदरगड व गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. आजरा, चंदगडसह धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाला असून, नद्यांच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, गुरुवारपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. गुरुवारी दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळीही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.सर्वाधिक पाऊस ८९ मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. राधानगरीत ७४ तर भुदरगडमध्ये ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजरा ६० तर चंदगड ५६ मिलिमीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस झाला असून, नद्यांच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.‘पाटगाव’ धरणक्षेत्रात तब्बल २४० मिलिमीटर पाऊसधरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाला असून, सर्वाधिक २४० मिलिमीटर पाऊस पाटगाव धरणक्षेत्रात झाला आहे. त्यापाठोपाठ घटप्रभा येथे २०५ मिलिमीटर व राधानगरी येथे १६० मिलिमीटर पाऊस झाला.
Kolhapur: ‘राधानगरी’, ‘भुदरगड’, गगनबावड्यात अतिवृष्टी; नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:47 PM