कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह काही तालुक्यांत सोमवारी पावसाची भुरभुर राहिली. दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.गेली पंधरा दिवस जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. पाऊस आज सुरू होईल, उद्या होईल या प्रतीक्षेत अखंड नक्षत्र गेले. पावसाने एकदमच दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन पावसाळ्यात शेतीसाठी विद्युत पंप सुरू करण्याची वेळी आली आहे.
सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात दिवसभर भुरभुर राहिली. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.आश्लेषार्क नक्षत्रसूर्याने रविवारी रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी आश्लेषार्क नक्षत्रात प्रवेश केला. वाहन मेंढा असून, या काळात पडणाऱ्या पावसाला सुनेचा पाऊस म्हणतात. या नक्षत्रातही वरूणराजा जोरदार बरसेल, अशी अपेक्षा आहे.