शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

कोल्हापुरात अतिवृष्टी, एका रात्रीत नद्या पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:18 AM

कोल्हापूर : कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त होऊन बुधवारी जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. ...

कोल्हापूर : कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त होऊन बुधवारी जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने एका रात्रीत जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या, तर तब्बल ४३ बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगेची पाणीपातळी अवघ्या काही तासांत १० फुटांनी वाढली. गगनबावड्यात तर ढगफुटीसदृश १८२ मिलिमीटर इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. एका रात्रीच्या पावसाने पूर येण्याची जून महिन्यातील आतापर्यंतच्या पावसाची ऐतिहासिक घटना ठरली आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण तेव्हा पावसाने हुलकावणी दिली आाणि बुधवारपासून पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज आल्यानंतर मात्र पावसाने जोरदार एन्ट्री घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जूनमधील पावसाला जोर नसतो, असाचा पारंपरिक अंदाज बांधून सर्व जण गाफील राहिले; पण पावसाने रात्री जोरदार हिसका दाखवत सर्वांचीच फजिती केली. रात्री १० वाजता सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी सकाळीपर्यंत अक्षरश: जिल्ह्याला झोडपून काढले. टपोऱ्या थेंबाच्या आवाजाने अनेकांनी रात्र जागूनच काढली.

रात्री अकराच्या सुमारास पावसाचा वेग वाढेल, तसे नद्यांवरील एका पाठोपाठ एक बंधारे पाण्याखाली जाऊ लागले. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणीपातळी सकाळी २४ फुटांवर गेली. राधानगरी व दूधगंगा खोऱ्यात अतिवृष्टी झाल्याने याला जोड असणाऱ्या पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा नदीवरील सर्वाधिक बंधारे वेगाने पाण्याखाली गेले. यात पंचगंगा व हिरण्यकेशी नदीवरील ७, भोगावती व दूधगंगा, वारणा नदीवरील २, तुळशी व कुंभी नदीवरील ४, कासारी नदीवरील एक, कुंभीवरील ४, घटप्रभा नदीवरील ६, वेदगंगा नदीवरील ८ बंधारे पाण्याखाली गेले.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी

जिल्हाभर पावसाने रात्रभर हाहाकार उडवला असताना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर ढगफुटीच झाली. जिल्ह्यातील १४ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २०० मिलिमीटरच्या वरच पाऊस झाला. सर्वाधिक २३१ मिलिमीटर पाऊस चंदगडमधील जांबरे जलाशयात झाला आहे. कुंभीमध्ये २२५, राधानगरीत २२०, दूधगंगा २००, पाटगाव २०७, तुळशी १८७, वारण १८५, घटप्रभा १५५ असा पाऊस झाला आहे.

रस्ते खचले, वाहतूक खोळंबली

एकाच वेळी धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अर्धवट कामे असलेल्या ठिकाणी वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. अचानक रस्त्यांवर, ओढ्यांवर पाणी आल्याने वाहतूकही खोळंबल्याने ऐनवेळी पर्यायी मार्ग शोधावे लागले. कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गावर माजगाव गावाजवळील लहान पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या तयार केलेला रस्ताच वाहून गेल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली.

नदीकाठावरचे कृषीपंप पाण्याखाली

साधारपणे जूनमध्ये कधीही पूर येईल असा पाऊस पडत नाही. त्यामुळे नदीकाठावरच्या पाण्याच्या मोटारी सुरूच असतात. त्या काढून आणल्या जात नाहीत; पण गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या पावसाने सकाळीच नद्यांना पूर आणल्याचे दिसले. तेव्हा नदीकाठावरील सर्वच मोटारी पाण्याखाली बुडाल्या. लार्टटच्या पेट्यादेखील पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पाऊस आणि पूर ओसरल्यावर गाळातून या मोटारी शोधणे व त्या काढून आणणे मोठ्या कष्टाचे व नुकसानीचे काम आहे.

शिवारे तुडुंब

ढगफुटीसारख्या धुवाधार कोसळलेल्या या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर शिवारे पाण्याने तुडुंब भरली आहे. भाताची खेचरे पाण्याने भरली आहेत. शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून पुढील आठवडाभर तरी शेतात पाय ठेवता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. धूळवाफ पेरण्यांची उगवण चांगली झाल्याने हा पाऊस त्यांना उपयुक्त ठरला आहे, तर ज्यांच्या अजून पेरण्याच झालेल्या नाहीत, त्यांचा मात्र आठवडाभराचा खाेळंबा झाला आहे.

२४ तासांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

गगनबावडा : १८२

शाहूवाडी : १२७

राधानगरी : ११९

पन्हाळा ११५

चंदगड : ११३

कागल : ११०

गडहिंग्लज : १००

भुदरगड : ९७

हातकणंगले: ८९

आजरा : ८५

शिरोळ : ७३

जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड

भोगावती : राशिवडे, हळदी

तुळशी : घुंगुरवाडी, बाचणी, आरे व बीड

दूधगंगा : सुळकूड, बाचणी

कासारी : यवलूज

कुंभी : सांगशी, मांडुकली, शेणवडे, कळे

वारणा : चिंचोली, माणगाव

घटप्रभा : कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी

हिरण्यकेशी : साळगाव, ऐनापूर, नीलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी, दाभील

वेदगंगा : निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली व चिखली

घटप्रभा शंभर टक्के भरले

जूनच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच धरण शंभर टक्के भरण्याची घटना घडली आहे. चंदगडमधील घटप्रभा हा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरून वाहू लागला आहे. त्यापाठोपाठ जांबरे जलाशयाचा साठा ८२ टक्केवर पोहचला आहे. पाटगाव, चित्री व चिकोत्राचा जलसाठा ४५ टक्केवर पाेहचला आहे. तुळशी ४६ टक्के, कुंभी ४३ टक्के, कोदे ४० टक्के, कासारी ३२ टक्के, कडवी ३८ टक्के, वारणा ३० टक्के, जंगमहट्टी २७ टक्के, दूधगंगा २८ टक्के, राधानगरी जलाशयातील साठा २२ टक्केवर गेला आहे.

जूनची सरासरी ओलांडली

गेल्यावर्षी संपूर्ण जून महिन्यात सरासरी ११६ मिलिमीटर पाऊस झाला होता; पण यावर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.