शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची भुरभुर, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 6:23 PM

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची भुरभुर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली.मध्यंतरी पावसाने काहीशी उसंत घेतली होती. मात्र शुक्रवारी रात्रीपासून पाऊस पुन्हा सुरू झाला. शनिवारी सकाळपासून भुरभुर कायम राहिली. सकाळी दहापर्यंत तर अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.

कोल्हापूर शहरात दिवसभरात हलक्या सरी तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिले. पावसाबरोबर थंड वारेही वाहत आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.२१ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ३१.५० मिलिमीटरची नोंद झाली. धरणक्षेत्रातही पावसाची रिपरिप सुरू आहे.वारणा ९६, तर दूधगंगा ९८ टक्के भरलेपावसाचा जोर होता, त्यावेळी वारणा व दूधगंगा या धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. आता विसर्ग कमी केल्यानंतर वारणा ९६ टक्के तर दूधगंगा ९८ टक्के भरले आहे. कुंभी (९४ टक्के) वगळता सर्वच सर्वच धरणे भरली आहेत.केर्ली-जोतिबा रोड अद्याप बंदचजिल्ह्यातील पुराच्या पाण्यामुळे बंद असलेले मार्ग सुरू झाले असले तरी केर्ली ते जोतिबा मार्ग खचल्याने वाहतूक बंद आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर