* ऊस पिकालाही फटका
शिरोळ / दत्तवाड / कुरुंदवाड / अर्जुनवाड : गेली चार दिवस हुलकावणी देणारा माॅन्सूनपूर्व पावसाने शिरोळ तालुक्यात दमदार एंट्री मारली. दुपारी तीनपासून तुफान वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून ऊस पिकासह टोमॅटो, भाजीपाला, फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. माॅन्सूनपूर्व पावसाने गुरुवार दुपारी हजेरी लावली. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सकाळपासून हवेत उष्णता होती. मात्र दुपारी वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे गावातील प्रमुख रस्त्यावरून पाणी वाहत होते. शेतामधील सरी भरून बाहेर पाणी पडले. दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून ऊस पीक वा-यामुळे पडले आहे. तर टोमॅटो, भाजीपाला यासह फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर वीटभट्टी व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. कुरुंदवाडमध्ये बाजारपेठेतील अनेक दुकानांसह सखल भागातील घरात पावसाचे पाणी शिरल्याने अन्नधान्याचे नुकसान झाले होते. तर शेतीतील पिके पाण्यात बुडाली आहेत. त्यामध्ये भात, सोयाबीन, भाजीपाला पिकांना पाणी जास्त होवून पिके कुजत आहेत. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला उत्पादक नुकसानीत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असल्याने पुन्हा भाजीपाल्याला दर मिळेल या आशेवर शेतक-यांनी नव्याने भाजीपाला पिकांची लागण केली आहेत. मात्र अवकाळी पावसाने शेतक-यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे.
फोटो - ०३०६२०२१-जेएवाय- ०३, ०४, ०५ फोटो ओळ - ०३) दत्तवाड (ता. शिरोळ) येथे पावसामुळे फुलशेतीमध्ये अशाप्रकारे पाणी साचले होते. ०४) दत्तवाड (ता. शिरोळ) येथे वादळी वा-यासह पावसामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले.
०५) कुरुंदवाड-शिरढोण रस्त्यालगत असलेल्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने भेंडीचे पीक धोक्यात आले आहे.