- प्रकाश पाटीलकोपार्डे -कुडित्रे ता.करवीर येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज चुरशीने मतदान सुरू आहे. मोठे मतदान असणाऱ्या गावात ५० टक्केहून अधिक मतदान झाले आहे. मध्यंतरी प्रक्रिया अत्यंत शांततेत सुरू आहे.
गेली महिनाभर आरोप प्रत्यारोपाने गाजत असलेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. दुरंगी लढत असल्याने दोन्ही बाजूने पॅनेल टू पॅनेल मतदान करण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चे बांधणे करण्यात आले आहे. वाकरे-५२ कुडित्रे ५७ कोपार्डे-६० कोगे-५५ सांगरुळ-५७ या गावात सकाळी 11 वाजेपर्यंत 50 टक्केच्यावर मतदान झाल्याने क्रॉस वोटिंग होत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मतदान बॅलेट पेपरवर असल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर तीन बुथ करण्यात आले आहेत.एका मतदाराला ५ गटाचे पाच मतपत्रिका व आरक्षणाच्या चार अशा नऊ पत्रिका हातात पडत असल्याने क्रॉस वोटिंग करणाऱ्या मतदाराला थोडा वेळ लागत असला तरी पॅनल पॅनल मतदान करणाऱ्या मतदार दुरंगी लढतीत एकच प्याला चिन्ह दिल्याने पटापट मतदान करून बाहेर ये येत आहे तर निवडणूक अधिकारी वैभव नावडकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रदीप मालगावे यांनी चोख नियोजन केल्यामुळे मतदान प्रक्रियेला वेग दिसत आहे.
कोपार्डे (ता करवीर)येथे सब खाडे महाविद्यालयात संस्था मतदारांना मतदान केंद्र करण्यात आले होते. येथे संस्था गटासाठी वर्ग संस्था गटात आमदार सतेज पाटील माजी आमदार चंद्रदीप नरके ग्रुपचे संचालक अजित नरके बाळासाहेब खाडे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील तर अ वर्ग सभासदांमध्ये शिक्षक आमदार जयंत तासगावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.