शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

हेल्मेट कारवाईने वाहनधारकांची तारांबळ

By admin | Published: June 10, 2017 12:45 AM

तीन दिवसांत ११८२ वाहनांवर कारवाई : ५ लाख ९१ हजार रुपये दंड वसूल, कारवाई सत्र आठवडाभर सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर सीटबेल्ट व हेल्मेट सक्तीमुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे. कारवाईच्या भीतीने हेल्मेट खरेदीसाठी नागरिकांचे पाय बाजारपेठेकडे वळू लागले आहेत. कारवाई सत्र राबविल्याने गेल्या तीन दिवसांत सुमारे ११८२ वाहनचालकांवर कारवाई करून सुमारे ५ लाख ९१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. शुक्रवारी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पूल ते वडणगे फाटा येथे वाहनचालकांवर कारवाई सुरू असताना वाहतुकीची कोंडी झाल्याने सुमारे अर्धा तास गोंधळ उडाला. त्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही कोंडी दूर केली. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अपघाती मृत्यूंची संख्या वाढत आहे. अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी वेळोवेळी पोलीस दलातर्फे प्रबोधन केले जात आहे. महामार्गावर दुचाकीस्वारास हेल्मेट सक्ती केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर हेल्मेट न वापरता वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून महामार्गावर चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना सीटबेल्ट व हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील पुणे-बंगलोर महामार्गावर पेठवडगाव, शिरोली एमआयडीसी, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, कागल पोलिसांनी कारवाई केली. यासह कोल्हापूर-रत्नागिरी, राधानगरी, गारगोटी, गगनबावडा, आदी मार्गांवरही पोलिसांनी नाकाबंदी करून सीटबेल्ट व हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. त्यामध्ये करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, गारगोटी, आदी पोलीस विशेष लक्ष देत आहेत. तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात सुमारे ११८२ वाहनचालकांवर कारवाई करून पोलिसांनी सुमारे ५ लाख ९१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. हे कारवाई सत्र आठवडाभर सुरू राहणार आहे.साहेब, उद्यापासून हेल्मेट घालतो !कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे २५ ते ३० पोलिसांचा फौजफाटा शुक्रवारी रस्त्यावर उतरला होता. यावेळी सीटबेल्ट व हेल्मेट न घालणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू होती. एका वेळी पन्नास ते साठ वाहने रस्त्यावर थांबविल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. ‘साहेब, आम्हाला काही माहिती नाही. उद्यापासून हेल्मेट घालून गाडी चालवेन,’ अशी विनवणी काही वाहनचालक करीत होते; परंतु पोलिसांनी दंडाची रक्कम भरूनच त्यांना सोडले. गाडी नि हेल्मेट मागून आणलंय!कोतोली परिसरातील दोघे दुचाकीस्वार कोल्हापूरला येत होते. दोघांकडेही हेल्मेट होते. त्यांच्याच एका मित्राला वडणगे फाटा येथे अडविले होते. त्याला पाहून ते थांबले. यावेळी त्यांच्या डोक्यावरील हेल्मेट पाहून तो म्हणाला, ‘संभा, तुझी तर गाडी नाही. तू हेल्मेट कोठून घेतलंस?’ संभाने हसत ‘गाडी आणि हेल्मेट मागून घेतले आहे. सीपीआरमध्ये नातेवाइकाला बघायला चाललोय.’ असे सांगितले. या दोघांतील संभाषण ऐकून उपस्थित वाहनधारक त्यांच्या तोंडाकडेपाहत बसले.