देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस (आय) चे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक सुशील पाटील-कौलवकर मंचच्या वतीने राधानगरी कोविड सेंटरला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांच्याकडे देण्यात आल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
राधानगरी तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोविड सेंटरवरील ताण लक्षात घेऊन सुशील पाटील युवा मंचच्या वतीने रुग्णांना अन्नधान्य, अंडी, जीवनावश्यक वस्तू, मास्क, सॅनिटायझर, आदींसह वस्तू देण्यात आल्या.
राधानगरी तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र शेट्ये, पीएसआय अनुराधा पाटील, प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. द. पाटील, संदीप पाटील कौलवकर, शंकर बनछोडे, बाबूराव पाटील, दिगंबर येरूडकर, संदीप पाटील (शिरगांवकर), आर. जी. चरापले, विकास चरापले, प्रदीप पाटील, बंडोपंत पाटील, चंद्रकांत पाटील, नितीन पाटील, पंकज पाटील, प्रमोद पाटील, विजय पाटील, बळवंत पाटील, प्रकाश चरापले, निवास चरापले, चेतन पाटील, सुशांत पाटील, आदी उपस्थित होते. आभार आरोग्य अधिकारी शेट्ये यांनी मानले.
फोटो ओळी :
राधानगरी कोविड सेंटरला अन्नधान्यासह विविध वस्तू देत असताना सुशील पाटील. यावेळी तहसीलदार मीना निंबाळकर, अनुराधा पाटील, के. द. पाटील, डॉ.शेट्ये, आदी मान्यवर.