पोळ यांचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : आर्थिक परिस्थिती हलाकीची व मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या अमृत कावडे या युवकास विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या पोळ यांनी एक लाखाची मदत करून मोलाची साथ दिली आहे. वडगाव पालिकेच्या सभेत नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील यांनी अमृतसाठी मदतीचे आवाहन केले होते. पोळ यांनी त्यास प्रतिसाद देत एक लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार प्रतिष्ठान व कार्यकर्त्यांच्यावतीने निधी देण्यात आला.
शहरातील विवेकानंद पथ येथील अमृत शंकर कावडे हा मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची असून, घरचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कावडेच्या खर्चिक असणाऱ्या उपचारांसाठी निधीची गरज होती. त्यामुळे माजी नगराध्यक्षा पोळ यांनी कावडे कुटुंबियांकडे ही मदत सोपवून उपचारासाठी हातभार लावला.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते विजय शहा, माजी नगराध्यक्ष अभिजित पोळ, माजी उपनगराध्यक्ष आनंदा म्हेत्रस, राजेंद्र देवस्थळी, रणजित यादव, अभिजित गायकवाड, रायसिंग भोसले, सचिन चव्हाण, आप्पासाहेब पाटील, रमेश पाटील, जयकुमार गणपते, रमेश दाभाडे आदी उपस्थित होते.
०८ वडगाव यादव हेल्प
फोटो- पेठवडगाव अमृत कावडे यास विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्यावतीने एक लाखाची मदत देताना विजय शहा, अभिजित पोळ, आनंदा म्हेत्रस, राजेंद्र देवस्थळी, रणजित यादव, अभिजित गायकवाड, रायसिंग भोसले, सचिन चव्हाण.