कोल्हापूर : ‘जिथे अत्यंत गरज तिथे प्राधान्याने मदत’ हे ब्रीद घेऊन सध्या कोरोनाच्या काळात कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅॅशियन २४ या संस्था कोल्हापुरातील गरजूंना मदतीचा हात देत आहेत. या सामाजिक संस्थांनी शनिवारी महाराष्ट्र दिनी दिव्यांग (अंध, अपंग), तृतीयपंथीय, गरीब अशा ४५० जणांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
या संस्थांनी दिव्यांग, तृतीयपंथी, अत्यंत गरीब कुटुंबांचे सर्वेक्षण करून ४५० जणांची यादी निश्चित केली. त्यांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी संस्थेचे प्रमुख मिलिंद धोंड, सदस्य सर्जेराव गायकवाड, बालाजी रोडगे, सुशांत टक्कळकी, ईलिशा धोंड, यासिन शानेदिवाण, उमर घाटगे, संदीप शेलार उपस्थित होते. दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात साडेतीन महिन्यांत या संस्थांनी शहरातील ५५० भटके श्वान, ६३ निराधार गायी, म्हैशी तसेच ३०० फिरस्त्यांना अन्न दिले. गरजू, निराधार गरीब कुटुंबे, दिव्यांग व्यक्तींच्या सुमारे ४,४६३ कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. जिल्हाधिकारी कार्यालयाला दोन सॅनिटायझर स्प्रे युनिट्स आणि सीपीआर रुग्णालयाला पाच वॉटर प्युरिफायर्सची मदत केली होती, अशी माहिती मिलिंद धोंड यांनी दिली.
फोटो (०२०५२०२१-कोल-कोल्हापूर वुई केअर) : कोल्हापुरात शनिवारी कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅॅशियन २४ या संस्थांकडून दिव्यांग, गरिबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
===Photopath===
020521\02kol_1_02052021_5.jpg
===Caption===
फोटो (०२०५२०२१-कोल-कोल्हापूर वुई केअर) : कोल्हापुरात शनिवारी कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅॅशियन २४ या संस्थांच्यावतीने दिव्यांग, गरीबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.