अडूर (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी सिद्धी मोहन कांबळे या विद्यार्थिनीस रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सिद्धीचे आई-वडील तिच्यासाठी कराव्या लागणाऱ्या दवाखान्यातील खर्चाचा आकडा पाहूनच हबकून गेले.
पुरोगामी संघटनेत कार्यरत असणाऱ्या सिद्धीच्या वर्गशिक्षिका अनुराधा वळसंगकर यांचा सिद्धीच्या उपचारासाठी निधी जमविण्याचा प्रयत्न पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांना समजताच पाटील यांच्या पुढाकाराने राबविलेल्या एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे पुरोगामी शिक्षक परिवार तसेच समाजातील दानशूरांकडून संकलित करण्यात आलेल्या सुमारे ६१ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रसाद पाटील यांनी सिद्धीच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केली.