येथील क्रशर चौकातील बारा वर्षीय श्रेया हिचे वडील प्रशांत हे सेंट्रिंग काम, तर आई मीना या शालेय पोषण आहार करण्यास मदतनीस म्हणून काम करायच्या. कोरोनामुळे सध्या या दोघांची कामे बंद झाली आहेत. या दाम्पत्याला तीन अपत्यांपैकी श्रेया ही सर्वांत लहान आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले हे सुतार दाम्पत्य आपल्या भाडेतत्त्वावरील घरात राहतात. मिळकत आणि कुटुंबास आवश्यक तो खर्च याची तोंड मिळवणीदेखील होत नाही. त्यातच श्रेया हिला कर्करोग असल्याचे निदान झाले आणि सुतार दाम्पत्य कोलमडून गेले आहे. श्रेया हिच्यावर कदमवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने सुतार दाम्पत्याने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
चौकट
मदतीसाठी ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’कडून सांगीतिक उपक्रम
कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या सुरू असलेल्या स्नेहसंगीत प्रतिज्ञा सांगीतिक या उपक्रम अंतर्गत बारा मैफिलीचे आयोजन केले आहे. कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या मैफिली फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल. मैफिलीचे प्रवेश शुल्क आहे. रसिक श्रोत्यांनी हे शुल्क श्रेया हिच्या उपचारांसाठी (Bank of India A/c no.090018210005677, Ifsc code:BKID0000900) या बँक खात्यावर थेट जमा करावे, असे आवाहन या संस्थेने केले आहे.
फोटो (१७०५२०२१-कोल-श्रेया सुतार फोटो)