शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

‘मिशन संवेदना’तर्फे गरजूंना मदतीचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:23 AM

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लादलेल्या निर्बधानंतर बेरोजगार, गरीब, अन्नापासून व आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून कोल्हापूर पोलीस ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लादलेल्या निर्बधानंतर बेरोजगार, गरीब, अन्नापासून व आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ या संकल्पनांतर्गत सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हातभार पुढे केला आहे. त्यातून गुरुवारी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे, जयसिंगपूर, कागल या पोलीस ठाण्यांच्यावतीने गरजूंना विविध स्वरुपात मदत करण्यात आली.

कोरोना संकटामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजूंना मदतीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या अधिपत्याखाली ‘मिशन संवेदना’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ही संकल्पना राबविताना पोलीस अधिकारी व अंमलदारांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये बेरोजगार, गरीब, अन्नापासून वंचित असलेले लोक, आरोग्यविषयक मदत आणि ज्यांना जमेल त्या स्वरुपात मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. त्यामध्ये येणाऱ्या कॉलला प्रतिसाद देऊन मदत केली जात आहे.

शिरोलीत बहुरूपी, गोपाळ समाजाला मदत

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बहुरूपी समाज, गोपाळ समाजातील वंचित कुटुंबीय, ताराराणी चौकानजीक मूर्ती विक्रेते, गरजू अशा सुमारे ३५० कुटुंबांना फूडस् पॅकेट पुरवण्यात आली. तसेच हालोंडी गावातील निराधार २० कुुटुंबांना प्रत्येकी एक महिनाभर पुरेल इतके धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले व त्यांचे पथक कार्यरत होते.

जयसिंगपूर पोलिसांकडून मास्क वाटप

जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोरगरीब लोकांना कोरोना रोगाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांना एन-९५ मास्कचे वाटप केले. यावेळी पोलीस निरीक्षकांसह पथक कार्यरत होते.

कागल पोलिसांकडून तृतीयपंथींना धान्य वितरण

कागल पोलीस ठाण्याच्यावतीने हद्दीतील तृतीयपंथीय लोकांच्या नऊ कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतके धान्य घरोघरी जाऊन वाटप केले. तसेच सफाई कामगारांना एन-९५ मास्कचे वाटप केले. या मदतीसाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे व त्यांचे पोलीस पथक पुढे सरसावले.

फोट नं. १३०५२०२१-कोल-शिरोली पोलीस

ओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेंतर्गत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना धान्य, मास्क वाटप करण्यात आले.

फोट नं. १३०५२०२१-कोल-कागल

ओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेंतर्गत कागल पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना मास्क वाटप करण्यात आले.

===Photopath===

130521\13kol_2_13052021_5.jpg~130521\13kol_3_13052021_5.jpg

===Caption===

फोट नं. १३०५२०२१-कोल-शिरोली पोलीसओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेर्तगत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना धान्य, मास्क वाटप करण्यात आले.फोट नं. १३०५२०२१-कोल-कागलओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेर्तगत कागल पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना मास्क वाटप करण्यात आले.~फोट नं. १३०५२०२१-कोल-शिरोली पोलीसओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेर्तगत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना धान्य, मास्क वाटप करण्यात आले.फोट नं. १३०५२०२१-कोल-कागलओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेर्तगत कागल पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना मास्क वाटप करण्यात आले.