गुरुवारी पहाटे ऊसतोडणी मजूर, शेतकऱ्यांना व्हनगुती येथील सतीश चौगले यांना मक्याच्या रानात गव्याचा कळप पिकाची नासधूस करताना दिसला. त्यांनी त्याला हुसकाविण्याचा प्रयत्न केला; परंतु गव्यांनी त्यांना दाद दिली नाही.
चार गवे वाघापूर परिसरात दाखल झाल्याचे समजताच लोकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे बिथरलेले गवे सैरावैरा पळू लागले. व्हनगुतीच्या सरपंच मधुरा खटागळे ,पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, अरुण पाटील यांनी लोकांना दक्षता घेण्यास सांगितले; पण हुल्लडबाज शेतकरी गव्यांना घाबरवत होते.
सकाळी साडेनऊ वाजता गव्यांनी मुदाळच्या डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. गव्यांनी ऊस लावणीचे तसेच मका, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान केले.
फोटो: १८ व्हनगुती गवा
व्हनगुती शिवारातील गव्यांचा कळप.