शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

मद्य व्यावसायिकांची ‘दादां’कडे धाव

By admin | Published: April 04, 2017 1:44 AM

कायदेशीर मार्ग काढण्याची विनंती : ‘ते’ रस्ते स्थलांतरित करण्याचा पर्याय शक्य

कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद झालेल्या शहरातील व ग्रामीण भागातील मद्यविक्रेते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. जे रस्ते २००१ नंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाकडे नव्हते, ते महानगरपालिकेकडे स्थलांतरित करण्याचे तांत्रिकदृट्या राहून गेले असे रस्ते महानगरपालिकेने देखभालीसाठी घेण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्यास त्या मार्गावरील मद्यालये पूर्ववत सुरू करण्याबाबतच्या निर्णयातून कायदेशीर मार्ग निघू शकेल, असा पर्याय चर्चेत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुचविला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे ५०० मीटर अंतरावरील सर्व बीअरबार परमीट रुम, बीअर शॉपी, वॉईन्स शॉप, देशी दारू दुकाने बंद झाली. यामुळे कोल्हापूर शहरातील सुमारे २१० पैकी १६१ मद्यालये शनिवारी बंद झाली. मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाची, पण देखभाल महानगरपालिकेकडे असे शहरातून जाणारे रस्ते या नियमातून वगळावेत यासाठी विविध मद्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी धावाधाव करून महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेतली. पण, प्रत्येक अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे बोट दाखविले. सायंकाळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन चर्चा केली. यावेळी चर्चेत जळगाव, जालना, नाशिक, लातूर, यवतमाळ येथील शहरांतून जाणारे राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आला असून, तसे झाल्यास कायदेशीर बाबीतून सुटका होऊन शहरातील मद्यालये सुरूराहण्यास अडचणी येणार नसल्याचे चर्चेत मंत्री चंद्रकांतदादांना पटवून दिले. या चर्चेत चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, सुनील मोदी, हरिदास सोनवणे, अरुण चोपदार, चंद्रकांत जाधव, कुमार सोनवणे,आदी सहभागी झाले होते. रस्ते महापालिकेकडे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी दिल्यास त्यावर जिल्हाधिकारी व त्यानंतर मुख्य सचिव यांच्यामार्फत प्रस्ताव आल्यास त्यावर सही करू,असेहीचंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. पाच लाख बेरोजगार होतीलराज्यातील दहा हजार मद्यालये बंद केल्यास त्यावर आधारित असणारे सुमारे पाच लाख लोक बेरोजगार होतील, तसेच अधिकृत ठिकाणी दारू न मिळाल्याने अनधिकृत ठिकाणी दारूपिण्याचे प्रमाण वाढेल. बेकायदेशीरपणे दारूची विक्री वाढण्याची शक्यताही मंत्री चंद्रकांतदादा यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांशी उद्या मुंबईत चर्चायाप्रश्नी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे तिघे उद्या, बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्याबाबत या तिघांचीही फोनवर चर्चा झाल्याचे समजते.