कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्या एकतर्फी कार्यमुक्तीला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाला हा झटका समजला जातो.जलजीवन मिशनमधील काम संथ असल्याचा ठपका ठेवत ८ मार्च रोजी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी धोंगे यांना एकतर्फी कार्यमुक्त केले होते. यावरून सर्वसाधारण सभेतही गोंधळ उडाला होता. त्यांच्या जागी तातडीने अमित पाथरवट यांचीही नियुक्ती करण्यात आली होती.दरम्यान धोंगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सुनावणी होवून बुधवारी त्यांच्या एकतर्फी कार्यमुक्तीला स्थगिती मिळाली आहे.
kolhapur zp: अशोक धोंगे यांच्या कार्यमुक्तीला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 2:33 PM