राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सूर्यनारायण आग ओकत असून, शुक्रवारी पारा ४१ अंश सेल्सिअसला जाऊन टेकला. एप्रिल महिन्यात मागील १0 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद यावर्षी झाली आहे. कोल्हापूरच्या सरासरी तापमानात नऊ डिग्रीने वाढ झाल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जागतिक तापमानवाढीची झळ सगळ्यांनाच बसत आहे.तापमान वाढीस वृक्षतोडीसह अनेक कारणे आहेत. याबाबत शास्त्रज्ञांनी धोक्याच्या सूचनाही दिल्या होत्या, पण त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. गेल्या १0-१५ वर्षांत तापमानात हळूहळू वाढ होत गेली, पण यंदाइतके तापमान गेल्या १0 वर्षांत वाढलेले नाही. यंदा जानेवारीपासूनच कडाक्याचे ऊन सुरू झाले. फेबु्रवारी, मार्चमध्ये तीव्रता वाढून सरासरी तापमान ३५ डिग्रीपर्यंत पोहोचले. त्याचवेळी एप्रिल, मे महिन्यांत पारा काय असणार? याचा अंदाज आला होता. त्यानुसार तापमानात वाढ होत गेली असून, आता हे तापमान ४१ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे.जिल्ह्यात २०१० पासूनच्या तापमानाची आकडेवारी पाहिली, तर इतकी वाढ कधीच झाली नव्हती. मागील १0 वर्षांत २६ एप्रिलचे सरासरी तापमान किमान २५, तर कमाल ३२ डिग्रीपर्यंत राहिले; पण यावर्षी २६ एप्रिलचे तापमान किमान २५, तर कमाल ४१ डिग्री आहे. १0 वर्षांच्या तुलनेत सरासरी किमान तापमानात फारसा फरक पडला नाही; पण कमाल तापमानात तब्बल नऊ डिग्रीने वाढ झाली आहे.उष्माघाताचे प्रमाण वाढलेजीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. आगामी आठ दिवस पारा वाढत जाणार असल्याने उष्म्याच्या तडाक्याने वयोवृद्ध नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.जास्त वजन असणाऱ्या, रक्तदाब, साखरेच्या रुग्णांना उष्माघाताचा त्रास अधिक होऊ शकतो. बुरशीजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे.नागरिकांनी काय करावेशक्य असल्यास दिवसातून दोनवेळा अंघोळ करावी.स्वच्छ धुतलेले कपडे वापरावेत.फ्रीजमधील एकदम थंड पदार्थ खाऊ नयेत.थंड माठातील किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.दिवसाला साधारणत: ३ ते ४ लिटर पाणी प्यायला पाहिजे.फ्रुट ज्यूस, लिंबू सरबत घ्यावे.तापमानवाढीचे परिणामबाष्पीभवन झपाट्यानेहोऊन पाणीसाठेमोकळे होतात.वादळी पाऊस, एकाच ठिकाणी अतिवृष्टीहोऊन नुकसानपिकांच्या उत्पादकतेत घटउष्म्यामुळे कीटक कमीहोऊन, परागीकरणथंडावते, परिणामी पिकांची उत्पादकता घटते.
उष्णतेचा १० वर्षांतील उच्चांक; पारा ४१ अंश सेल्सिअसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:41 AM