कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या कमी येण्याचे
नाव घेत नसून शनिवारी संध्याकाळी संपलेल्या २३ तासात तब्बल ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवे १७६१ रुग्ण नोंदवण्यात आले असून १४९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. काही केल्या
मृत्यूदर कमी येत नसल्याने आरोग्य विभाग हवालदिल झाला आहे.
कोल्हापूर शहरात सर्वाधिक ३७५ रुग्ण आढळले
असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात १७८, गडहिंग्लज तालुक्यात १५५, भुदरगड तालुक्यात
१४४ तर हातकणंगले तालुक्यात १३९ रुग्ण आढळले आहेत. यातील भुदरगड तालुक्यातील रुग्णसंख्या
अचानक वाढल्याचे दिसून येते. इतर जिल्ह्यातील ९९ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत.
मृतांमध्ये कोल्हापूर शहरातील ११ जणांचा समावेश
असून त्याखालोखाल गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी ८ जणांचा मृत्यू झाला
आहे. शिरोळ तालुक्यात सात तर करवीर, इचलकरंजीमध्ये सहा तर इतर जिल्ह्यातील सात जणांचा
मृत्यू झाला आहे.
चौकट
कोल्हापुरात सर्वाधिक
मृत्यू
कोल्हापूर ११
साने गुरूजी वसाहत २, शिवाजी पेठ २, कसबा बावडा,
सदर बझार, मंगळवार पेठ, रमणमळा, राजाराम कॅलनी, शाहुपुरी, टेंबलाई
हातकणंगले ०८
किणी, देवकाते मळा, खोतवाडी
२, कबनूर, नेज, हातकणंगले, तारदाळ
गडहिंग्लज ०८
हसूरचंपू, चन्नेकुपी,
बसर्गे, कडलगे, गडहिंग्लज ४
शिरोळ ०७
यड्राव, टाकवडे, उदगाव
२, शिरोळ, जयसिंगपूर २
करवीर ०६
जमदाडे, प्रयाग चिखली,
नेर्ली, तामगाव, देवाळे, हिरवडे
इचलकरंजी ०६
शहापूर, इचलकरंजी, आर.
के. नगर, वेताळ पेठ, पंचगंगा कारखाना रोड, सरस्वती मार्केट
भुदरगड ०३
मडूर, कारिवडे, परळी
पन्हाळा ०२
भाचरेवाडी, कोडोली
कागल ०२
तमनाकवाडा, वंदूर
चंदगड ०१
चिंचणी राजगोळ
राधानगरी ०१
राधानगरी
इतर ०७
चोपडी, मांगनुर, निपाणी,
गणेशनगर मिरज, कोगनोळी, नहारे रोड पुणे, पडेल
चौकट
मृत्यू रोखण्याचे आव्हान
गेले पंधरा दिवस ज्या
पध्दतीने रोज सरासरी ५० जणांचे मृत्यू होत असून अजूनही यावर हा मृत्युदर रोखण्यात आरोग्य
विभागाला यश आलेले नाही. संपूर्ण देशभरात कोल्हापूरचा मृत्यूदर सर्वाधिक असून हीच आरोग्य
विभाग आणि प्रशासनाची चिंता वाढवणारी बाब आहे.