तानाजी पोवार।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्णात गगनबावडा तालुका हा मुसळधार पावसाचे ठिकाण मानले जात असले तरी त्यासह चंदगड, आजरा आणि राधानगरी तालुक्यांत गेल्या तीन महिन्यांत पावसाने उच्चांक गाठला. गगनबावडा तालुक्यातील गगनबावड्यामध्ये सर्वाधिक सुमारे ५ हजार ६२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विश्ोष म्हणजे दि. ३० जुलै ते १० आॅगस्ट या कालावधीत मुसळधार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीतून सुमारे ६६.१४ टीएमसी पाणी वाहून गेले. त्यापैकी फक्त १२ टीएमसी पाणी हे राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी या धरणांतून वाहून गेल्याची अधिकृत नोंद आहे.दि. ५ ते ११ आॅगस्टदरम्यान झालेल्या पावसाने २००५ च्या महापुराचे रेकॉर्डही तोडले. या पुरातून कोल्हापूरकर सध्या सावरत आहेत. जिल्ह्णात गगनबावड्यासह चंदगड, आजरा, राधानगरी तालुक्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात गगनबावड्यामध्ये सर्वाधिक ५६२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ आजरा तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद असली तरीही चंदगड तालुक्यातील हिरे या गावात ४७३५ मि.मी. अशी, तर आजरा तालुक्यातील गवसे येथे ४४२५ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ राधानगरीमध्ये ३८८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्णात दूधगंगा (काळम्मावाडी), राधानगरी ही दोन प्रमुख धरणे होत. दूधगंगा धरणाची क्षमता २५.४० टीएमसी असली तरी या धरणातून सुमारे ४२ टीएमसी पाणी पुढे वाहून गेले. या धरणाचे पाणी तुरंबे, वाळवे, कागल, सुळकूडमार्गे कृष्णा नदीला मिळते. तेथून पुढे ते कर्नाटकात जाते; तर कोल्हापूरच्या महापुराचा संबंध तसा पंचगंगा नदीशी येतो. राधानगरी धरणाची क्षमता ८.३६ टीएमसी असली तरीही या धरणातून सुमारे ८.९० टीएमसी पाणी नदीमार्गे वाहून गेले आहे. दि. ३० जुलै ते १० आॅगस्टपर्यंत पंचगंगा नदीतून एकूण ६६.१४ टीएमसी पाणी वाहून गेले असले तरी त्यापैकी फक्त १२ टीएमसी पाणी हे राधानगरी, तुळशी, कुंभी आणि कासारी धरणांतील आहे.राजाराम बंधाऱ्यावरून ७५ हजार क्युसेक पाणी वाहिलेपूरपरिस्थिती कालावधीत कसबा बावडा येथील राजाराम बंधाºयावरून सुमारे ७५ हजार क्युसेक पाणी पुढे गेल्याची नोंद आहे. यापूर्वीच्या नोंदीनुसार दरवेळी सरासरी ३२ हजार क्युसेक पाणी वाहून जाते; पण यंदा या वाहून जाणाºया पाण्याने विक्रम नोंदविला आहे. तर गेल्या तीन महिन्यांत राजाराम बंधाºयावर १२७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गगनबावड्यात सर्वाधिक ५६२९ मिलीमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:58 AM