मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी दुपारी साडेतीन वाजता किणी टोलनाक्यावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजूच्या मार्गावर मंत्री नारायण राणे यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत महामार्गावर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भावन, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, आण्णासाहेब बिल्लोरे, संदीप दबडे यांनी संतप्त भावना व्यक्त करत येथून पुढील काळात शिवसेनेच्या विरोधात भाजपसह कोणीही आक्षेपार्ह विधान केल्यास शिवसेनास्टाईलने जशास तसे उत्तर देऊ असा इशारा यावेळी दिला. आंदोलनात वैभव उगळे, सुहास माने, नारायण कुंभार, शशिकांत पाटील, संदीप पाटील, मधुकर पाटील, आनंदा शेट्टी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगलाताई चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुवर्णा धनवडे, उपतालुका प्रमुख मालती खोपडे, तालुकाप्रमुख उषाताई चौगुले आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
................................................................
फोटो ओळी..
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत शिवसेनेच्यावतीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाक्यावर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, साताप्पा भावना, बाजीराव पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी रास्ता रोको केला.