शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

वीज दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:13 AM

कोपार्डे : शेती पंपाच्या वीजदरवाढीने सहकारी पाणीपुरवठा संस्था मेटाकुटीस आल्या असताना पुन्हा महावितरणकडून सरकारला ६० ते ७६ टक्के वाढ वेगवेगळ्या अश्वशक्तीच्या विद्युतपंपास सादर केल्याने सहकारी पाणीपुरवठा संस्था पर्यायाने शेतकºयांचे कंबरडे मोडणार असून, शेती व्यवसाय अडचणीत येणार आहे.दरवर्षी वीज, पाणी, खते, बियाणे, मजुरी यांच्यात भरमसाट वाढ होत असून, शेतकरी मेटाकुटीला आला ...

कोपार्डे : शेती पंपाच्या वीजदरवाढीने सहकारी पाणीपुरवठा संस्था मेटाकुटीस आल्या असताना पुन्हा महावितरणकडून सरकारला ६० ते ७६ टक्के वाढ वेगवेगळ्या अश्वशक्तीच्या विद्युतपंपास सादर केल्याने सहकारी पाणीपुरवठा संस्था पर्यायाने शेतकºयांचे कंबरडे मोडणार असून, शेती व्यवसाय अडचणीत येणार आहे.दरवर्षी वीज, पाणी, खते, बियाणे, मजुरी यांच्यात भरमसाट वाढ होत असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्था अडचणीत येत आहेत. मार्च २०१८ ला महावितरणने प्रतियुनिट २३ पैसे वाढ केली असताना पुन्हा वेगवेगळ्या विद्युत पंपासाठी महावितरणने ६० ते ७६ टक्क्यांपर्यंत वीजदरवाढीचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवल्याने वीज बिलात तिप्पटीने वाढ होणार आहे. पाणीपुरवठा संस्थांना आपल्या पाणीपट्टीत वाढ करावी लागणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याची भीती व्यक्त होत आहे. मार्च २०१८ मध्ये पाणीपुरवठा संस्थांच्या वीजदरात २३ पैसे प्रतियुनिट वाढ करण्यात आली. मात्र, यातून महावितरण कंपनीला होणारा तोटा कमी होणार नाही हे कारण पुढे करून महावितरणने ११ जुलै २०१८ पासून वेगवेगळ्या अश्वशक्तीच्या विद्युत पंपांसाठी ६० ते ७६ टक्के जी प्रस्तावित वीजदर वाढ दिली आहे यामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्थांना तिप्पट पाणीपट्टी करावी लागणार आहे अन्यथा पाणीपुरवठा संस्था मोडणार आहेत. ही पाणीपट्टी वाढली तर शेतकºयांना प्रति एकर १८ ते १९ हजार पाणीपट्टी द्यावी लागेल.शेतीवरील संकटमार्च २०१८ मध्ये विद्युतपंपासाठी जी २३ पैसे वीज दरवाढ करण्यात आली त्याबाबत एन. डी. पाटील यांनी आवाज उठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करून ती मागे घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते; पण याबाबत आजपर्यंत मुख्यमंत्र्यांना सवड झालेली नाही.पॉवर फँक्टर पेनल्टी आकारून लूटसध्या पावसाळा आहे. एबी स्विच बंद आहेत. विद्युतपंप बंद आहेत.एक युनिट ही वीज वापर नाही. विद्युतपंप काढून घेण्यात आले आहेत;पण महावितरणने सहकारी पाणीपुरवठा संस्थांना हजारो रुपयांची पॉवर फॅक्टर पेशल्टी आकारून सहकारी पाणीपुरवठा संस्थांची आर्थिक लूट केली आहे.चार वर्षांत दुप्पट वीज बिलवाकरे (ता. करवीर) येथील एका पाणीपुरवठा संस्थेला येणारे तीन लाख ५० हजार विद्युतपंपासाठीचे वीज बिल २०१७/१८ मध्ये ८ लाख ८ हजार ६३० म्हणजे दुप्पटीने आले आहे. यामुळे सध्या एकरी ७ हजार ६०० रुपये प्रतिएकर असणारी पाणीपट्टी आता पाणीपुरवठा संस्थांना दुप्पट करावी लागणार आहे.