शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

चाफेवाडी-धुमाळवाडीजवळ डोंगर खचला

By admin | Published: July 13, 2016 12:33 AM

जीवितहानी नाही : पाच एकर शेतीचे नुकसान, शेतजमीन व विहीर भुईसपाट

धामोड / कसबा तारळे : राधानगरी तालुक्यातील चाफेवाडी-धुमाळवाडी गावादरम्यान तुळशी नदी पुलानजीकचा रस्त्याच्या वरील बाजूस असणारा एक हजार फूट उंचीचा डोंगर खचल्याने पाच एकर शेतीचे नुकसान झाले. संपूर्ण डोंगरच अतिवृष्टीने खचल्याने या पुलाजवळील ६०० फूट रस्ताही खचला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी या शेतातील ऊस, भात, पिकांबरोबर मोठ-मोठी झाडेही या मातीखाली गाडली गेली आहेत. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी खोदलेल्या विहिरीही जमीनदोस्त झाल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आहे.गेल्या चार दिवसांपासून या परिसरात पावसाने अक्षरश: थैमान घातल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी दुर्गमानवाड-तळगाव मार्गावरील चाफेवाडी-धुमाळवाडी दरम्यान तुळशी नदीवर असणाऱ्या पुलाजवळील रस्त्याच्या वरील बाजूचा एक हजार फूट उंचीचा डोंगरच खचून खाली घसरल्याने जवळपास ६०० फूट लांबीचा रस्ता गायब झाला. रस्त्यासह खचलेल्या त्या मातीने पाच एकरांवरील ऊस व भातशेती गाडून टाकली. हा डोंगर इतक्या मोठ्या प्रमाणात खचला की, शेतामध्ये घसरणारी मोठ-मोठी झाडेही त्यात गाडली गेली आहेत. शेतातील विहिरी, मोटारपंप तर गायबच झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाचे प्रमाण आजही जास्त असल्याने या मार्गावर कोणतीही रहदारी नव्हती. किंबहुना शेताकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चाफेवाडी ते धुमाळवाडी या रस्त्यावर खचलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भाऊ धोंडी काटकर यांची सात गुंठे शेतजमीन तर अतिवृष्टीमुळे खचून ती खचलेल्या रस्त्यावर आली. त्यामुळे यापूर्वीच खचलेल्या रस्त्याला वरील जमिनीचा मोठ्या प्रमाणातील भार सहन न झाल्याने रस्ता शेतजमिनीसह खालील बाजूस असणाऱ्या बाळू धोंडी काटकर यांच्यासह १५ गुंठे ऊस पिकाच्या शेतविहिरीत कोसळली. पडलेल्या दगड, मातीमुळे ही शेतजमीन व विहीर भुईसपाट झाली. याशिवाय बाळू काटकर, लहू काटकर, शंकर काटकर, हिंदुराव काटकर या शेतकऱ्यांच्याही शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माळीण दुर्घटनेसारखी स्थिती येथे पाहावयास मिळत असून, पावसाचे प्रमाण कमी होत नसल्याने अजूनही डोंगर खचत आहे. या शेतकऱ्यांची शेतीच पूर्णत: मातीखाली गाडल्याने येथे आमची शेती होती का? या विचारात इथला शेतकरी उद्विग्न मनाने विचार करीत होता. लोकांना सध्या या मार्गावरून रस्ताच नसल्याने येत्या काही दिवसांत डोंगरातूनच मार्ग काढावा लागणार आहे. अधिकारी, आमदार धावलेया घटनेची माहिती कळताच राधानगरीचे तहसीलदार शिवाजी शिंदे व गटविकास अधिकारी एच. डी. नाईक, मंडल अधिकारी, तलाठी तसेच आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण खात्याचे सभापती अभिजित तायशेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली; पण मंगळवारीही पावसाचे प्रमाण कायम असल्याने सुमाळवाडी-बेरकळवाडी ग्रामस्थांना कोणतेच मदतकार्य करता आले नाही.अतिवृष्टीमुळे हा डोंगर खचला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ताही खचल्याने या लोकांना कोणतीच मदत पुरविता येत नाही. पण, पर्यायी रस्ता करून मदत करण्यात येईल व या लोकांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात येईल.- शिवाजी शिंदे, तहसीलदार, राधानगरी.