बेळगाव : बेळगाव येथील शेट्टी गल्लीतील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी मंगळवारी कोट्यवधी रुपयांची सांबराची शिंगे, हस्तिदंत, वाघाची नखे आणि खवल्या मांजराचे कातडे जप्त केले आहे. याप्रकरणी मंगळवारी सलिम सौदागर याला, तर मझहरखान सौदागर आणि अमजद खान सौदागर यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलिस आयुक्त शंकर मारिहाळ आणि जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी दिली. मार्केट पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे.याबाबत माहिती अशी, ज्या घरात प्राण्यांची शिंगे, हस्तिदंत आणि अन्य वस्तू ठेवण्यात येत होत्या, त्या घरात भूत असल्याची अफवा गल्लीत पसरविण्यात आली होती. घरात वीजदेखील नव्हती. त्यामुळे रात्रीच्यावेळी तेथे काय चालते, हे कोणालाही समजत नसे. सलीम आपल्या कारमधून प्राण्यांची शिंगे आणि अन्य वस्तू आणायचा आणि या घरात ठेवायचा. नंतर वन्य प्राण्यांची शिंगे, हस्तिदंत, वाघाची नखे आणि खवल्या मांजराचे कातडे कारमधून मुंबईला न्यायचा आणि तेथून ते चीनला पाठविले जायचे. या साऱ्यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जप्त केलेल्या पोलिसांनी व्यक्त केला आहे. जप्त केलेल्या प्राण्यांची शिंगे आणि अन्य वस्तंूचे मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांनी वनखात्याशी संपर्क साधला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जनावरांची शिंगे आणि अन्य वस्तू पाठविण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मार्केट पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जप्त केलेल्या या जंगली प्राण्यांच्या वस्तू कोट्यवधी किमतीच्या असू शकतात, असा अंदाज पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.बेळगावात वन्यजीव तस्करीचे मोठे रॅकट उघड सांबाराची शिंगे, हस्तिदंत आणि पँगोलिनचे कातडे बेकायदेशीररीत्या बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. मंगळवारी सलिम सौदागर याला पोलिसांनी अटक केली होती, तर मझहरखान सौदागर आणि अमजद खान सौदागर यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. १९०१ सांबाराच्या शिंगांचे वजन एक टन इतके आहे. पँगोलिनच्या मांसाला आणि कातड्याला गोव्यासह देशभरात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची किंमत कित्येक कोटी आहे. सांबराच्या शिंगाचा वापर औषधासाठी तसेच शोभेच्या वस्तूसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे चीन आणि व्हिएतनाम येथे या शिंगाना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बेळगाव पोलिस कसून तपास करत आहेत. चौकशी पूर्ण झाल्यावर जप्त करण्यात आलेली शिंगे आणि अन्य वस्तू वन खात्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट यांनी दिली आहे.
बेळगावमध्ये हस्तिदंत, वाघनखे, शिंगे जप्त
By admin | Published: October 13, 2016 1:51 AM