कोपार्डे : कोल्हापूरच्या पश्चिमेला करवीर-पन्हाळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या वाघजाई डोंगराला अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे काळाकुट्ट निसर्ग झाला आहे. या डोंगररांगा पावसाळ्यात हिरवाईने नटतात, तर उन्हाळ्यात डोंगरमाथ्यावरील गवत वाळलेले असले तरी निसर्गाचा वेगळाच नजराणा निर्माण होतो, पणडोंगराला आगी लावण्याच्या मानसिकतेतून बहुमोल वनसंपदेबरोबर वन्यप्राणी जीवनही प्रभावित होत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड, विशाळगड, गगनगड या दुर्गांबरोबर राधानगरी अभायारण्य, धरण अशी अनेक नैसर्गिक विविधता पहायला मिळते. ही विविधता जोपासण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनीही आपले कसब लावून लोकांना हा ठेवा जोपासण्यासाठी जागृत केले होते.यातीलच एक म्हणजे करवीर व पन्हाळा तालुक्यांच्या सीमेवर असणारा वाघजाईचा डोंगर होय. कोल्हापूरच्या पश्चिमेला केवळ आठ-दहा किलोमीटर असणारा हा वाघजाईचा डोंगर कोल्हापूर- गगनबावडा मार्गामुळे तसा पर्यटकांचे आकर्षण ठरतो. पावसाळ्यात या डोंगरावर हिरवाईमुळे निसर्गाने हिरवागार शालू परिधान केल्याचा भास होतो. या डोंगराच्या शिखरावर नयनरम्य असे वाघजाई देवीचे मंदिर आहे. जवळपास सहा ते सात किलोमीटर पसरलेल्या डोंगररांगांमुळे या परिसराला एक वेगळेच नैसर्गिक सौंदर्य निर्माण झाले आहे. या डोंगरावरील माथ्यावर बराच भाग पठारी आहे. काहींनी या डोंगरावर शेती करण्याच्या उद्देशाने तोडमोड केल्याने नैसर्गिक ठेवण बिघडतआहे.आता तर काही अज्ञातांनी या डोंगराला आगी लावण्याचे सत्र चालू केले आहे. यात या डोंगरावरील वनसंपदेबरोबर सरपटणारे प्राणी, वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. अशा प्रवृत्तींविरोधात डोंगररांगांजवळ असणाºया गावांनी प्रबोधन करण्याबरोबर आग लावणाºयांविरोधी कडक भूमिका घ्यायला हवी.डोंगरमाथ्यावर शाहूकालीनपाण्याची विहीर, वाड्याचे अवशेषया डोंगरावर छत्रपती शाहू महाराज विश्रांतीसाठी येत असल्याचे वयोवृद्ध लोकांकडून सांगितले जाते. या ठिकाणी दीड-दोनशे फूट खोल विहीर असून एवढ्या डोंगरमाथ्यावर असूनही स्वच्छ व भरपूर पाणी आहे. या विहिरीवर दगडी चौथºयाचे मोटचे अवशेष असून शाहू महाराज स्वत: ती चालवत असत, असे सांगितले जाते. या ठिकाणी गाई व घोड्यांचा मोठा तबेला होता. त्याचे अवशेष आजही आहेत.
वाघजाईच्या डोंगरावरील ऐतिहासिक ठेवा करपतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:06 AM