शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

हिटणी-नूल नवीन पुलासाठी जनआंदोलनाची तयारी : हिटणीकरांना मिळणार आरोग्य-शिक्षण सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:19 AM

राम मगदूम ।गडहिंग्लज : हिटणी ग्रामस्थांना सार्वजनिक आरोग्य सेवा- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणसहजपणे उपलब्ध होण्यासाठी आणि गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील अरळगुंडी, कडलगे, नांगनूर व खणदाळ या चार खेड्यांना तालुक्याच्यागावी गडहिंग्लजला येण्या-जाण्याचे अंतर कमी होण्यासाठी हिरण्यकेशी नदीवर ‘हिटणी-नूल’ दरम्याननवीन पूल बांधण्याची गरज आहे.या मागणीसाठी पूर्वभागातीलजनता उठाव करण्याच्या पावित्र्यात आहे.‘निलजी-नूल’ बंधाऱ्या पुढील ...

ठळक मुद्देअरळगुंडी, कडलगे, नांगनूर, खणदाळ, नूल ग्रामस्थांची होणार सोय

राम मगदूम ।गडहिंग्लज : हिटणी ग्रामस्थांना सार्वजनिक आरोग्य सेवा- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणसहजपणे उपलब्ध होण्यासाठी आणि गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील अरळगुंडी, कडलगे, नांगनूर व खणदाळ या चार खेड्यांना तालुक्याच्यागावी गडहिंग्लजला येण्या-जाण्याचे अंतर कमी होण्यासाठी हिरण्यकेशी नदीवर ‘हिटणी-नूल’ दरम्याननवीन पूल बांधण्याची गरज आहे.या मागणीसाठी पूर्वभागातीलजनता उठाव करण्याच्या पावित्र्यात आहे.‘निलजी-नूल’ बंधाऱ्या पुढील गावांनाही ‘चित्री’चे पाणी हक्काने मिळावे, ही मागणी जोर धरली असतानाचा ‘हिटणी-नूल’ पुलाची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे अनेक वर्षे विकासापासून दूर असणारी पूर्वभागातील जनता दळणवळणासाठी रस्ते, सार्वजनिक आरोग्य सेवा आणि शेती व पिण्याचे पाणी या मूलभूत प्रश्नासंदर्भात जागृत आणि संघटित होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘हिटणी’ हे सुमारे ३५०० हजार लोकवस्तीचे गाव ‘गडहिंग्लज-संकेश्वर’ या सध्याच्या राज्य महामार्गावरील आणि नियोजित ‘संकेश्वर-आंबोली’ राष्ट्रीय महामार्गावर गडहिंग्लजपासून १५ कि. मी. अंतरावर आहे. हिटणी नाक्यापासून गाव सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. येथील जागृत देवस्थान श्री. बसवेश्वर मंदिराचा समावेश ‘क’ वर्ग पर्यटनस्थळात झाला आहे. येथे दर्शनाला येणाºया सीमाभागातील भाविकांची संख्याही मोठी आहे. मात्र, रस्ताच नसल्यामुळे भाविकांची मोठी कुचंबणा होत आहे.

हिटणी गावातील कांही शेतकºयांच्या जमिनी नदीच्यापलीकडे नूल व खणदाळच्या हद्दीत आहेत, तर नूल व खणदाळच्याजमिनी हिटणी गावच्या हद्दीत आहेत. त्यामुळे दोन्हीकडील शेतकºयांना सध्या केवळ ‘होडी’चाच आधार आहे. दरम्यान, होडी नादरुस्त झालेस १५ ते २० कि.मी. अंतराचा फेरा करावा लागतो. शेती कसण्यासाठी आणि शेतीमाल वाहतुकीसाठी पूल होणे गरजेचे आहे. त्यामुळेच पुलाच्या मागणीसाठी शेतकरीदेखील सरसावले आहेत.हिटणी हे गाव नूल प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आले आहे. मात्र, रस्त्याची सोय नसल्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवाहिटणी ग्रामस्थांसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच आहे. नूलच्या आरोग्य केंद्राला जाण्यासाठी तब्बल २० किलोमीटरचा फेरा पडत आहे. ‘हिटणी-नूल’ दरम्यान पूल झाल्यास नूलला जाण्यासाठी १० ऐवजी केवळ ३ किलोमीटरमध्ये पोहोचता येणार आहे, त्यामळे नवीन पुलाची मागणी जोर धरत आहे.५५आरोग्य सेवा मिळणारहिटणीतील एखादा अत्यवस्थ रूग्ण किंवा अडलेल्या महिलेला प्रसुतीसाठी संकेश्वर किंवा गडहिंग्लजला जावे लागते. मात्र, पूल झाल्यास ग्रामस्थांना अवघ्या ३ कि. मी. अंतरावरील नूल प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आपत्तकालीन परिस्थितीत हा पूल ग्रामस्थांचा ‘जीवनदूत’ ठरणार आहे.सामानगड-हिटणी-काळभैरी कॉरिडॉरशिवकालीन ऐतिहासिक किल्ले सामानगड किल्ला हिटणीपासून १३ कि. मी. अंतरावर आहे. हिटणी-नूल दरम्यान पुलाची सोय झाल्यास सामानगडावर येणारे पर्यटक दर्शनासाठी हिटणी येथील प्राचीन बसवेश्वर मंदिराला येऊ शकतात. त्याप्रमाणेच हिटणीपासून २० किलोमीटर अंतरावरील गडहिंग्लजनजीकच्या श्री काळभैरी मंदिरापर्यंतचा पर्यटनाचा कॉरिडॉरही नव्या पुलामुळे विकसित होऊ शकतो. त्यादृष्टीनेही शासनाने विचार करण्याची गरज आहे. 

हिटणी गाव नूल प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आले आहे. मात्र, दळणवळणाची सोय नसल्याने ग्रामस्थांसाठी सेवा केवळ नावापुरतीच आहे. तसेच गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळेच आपण पुलासाठी आग्रही आहे.- सुजाता कंकणवाडी, सरपंच हिटणी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा