शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

प्रेक्षकांच्या ह्दयात मिळवले ‘हिय्या’ ने स्थान

By admin | Published: February 03, 2015 12:16 AM

अंतिम दिवशी एकांकिका उत्कृष्ट : जयसिंगपूर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

जयसिंगपूर : आम्ही रसिक जयसिंगपूर आयोजित श्री दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम दिवशी स्पर्धेची उंची वाढवणाऱ्या ठरला.प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या एकांकिकेत सरुवातीला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिचवड यांनी ‘कॉन्टास’ या एकांकिकेने स्पर्धेत रंगत आणली. प्रणव जोशी (शाम) व श्रृती कुलकर्णी (मीरा) यांचे अभियन उत्कृष्ठ झाले.रंगमुद्रा प्रतिष्ठान अहमदनगर यांची ‘ओपुनशिया’ ही एकांकिका सादरीकरणाच्या दृष्टीने उत्तम झाली. प्रशांत शेळके, अर्चना खरपुडे यांचे अभियन चांगले झाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांनी नीलेश गोपनारायण दिग्दर्शित ‘हिय्या’ या एकांकिकेने रसिकांच्या मनात घर केले. रस्त्यावर पोल उभा करणाऱ्या मजुरांच्या जीवनावरील कथा. मनोज भिसे (मास्टर), मंथन खाडके (गण्या) यांचा अभियन उत्तम होता. स्वानंद देसाई यांची प्रकाश योजना सूचक होती.त्यानंतर ‘एका लग्नाची पस्तीशी’ ही एकांकिका शब्द क्रिएशन मुंबईने उत्तम सादर केली. लग्न ही काळाची गरज आहे. जगण्याचे एक साधन आहे. एक पस्तिशीतला लग्न न झालेल्या तरूणाची ही कथा आहे. घर, आॅफिस व समाज यांच्याकडून तरूणास होणारा त्रास यात दाखविला आहे.के. टी. एच. एम. महाविद्यालय नाशिकने ‘वॉटस् अ‍ॅप’ ही एकांकिका आजच्या वॉटस् अ‍ॅपच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या तरूणांवर भाष्य करणारी ठरली. दहावीतील जुने मित्र वॉटस् अ‍ॅपवर भेटतात व मग त्यातून अश्लील मॅसेज, धर्मभावना दुखविणे, त्यामुळे होणाऱ्या दंगली आणि मग हे संगळे संपविण्यासाठी महाराजांचे पुन्हा येणे, असा ज्वलंत विषय मांडला आहे. (प्रतिनिधी)