शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भंडाऱ्याची उधळण, जयजयकारात मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:40 PM

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्यांची उधळण, अखंड जयजयकार, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावरून रविवारी मिरवणूक निघाली. गजनृत्य, धनगरी ढोलवादन पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. धनगर महासंघ, धनगर समाज युवक संघटना, मल्हार सेनेतर्फे मिरवणूक आयोजित केली होती.

ठळक मुद्देभंडाऱ्याची उधळण, जयजयकारात मिरवणूक उत्साहातपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती; आबालवृद्धांचा सहभाग

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्यांची उधळण, अखंड जयजयकार, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावरून रविवारी मिरवणूक निघाली. गजनृत्य, धनगरी ढोलवादन पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. धनगर महासंघ, धनगर समाज युवक संघटना, मल्हार सेनेतर्फे मिरवणूक आयोजित केली होती.आकर्षकपणे सजविलेल्या रथातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास दसरा चौकातून मिरवणुकीचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी मल्हारसेना सरसेनापती बबनराव रानगे होते.

मिरवणुकीत आकर्षक सजविलेल्या रथापुढे धनगरी ढोल, बँडपथकाचा दणदणाट, समाजबांधवांकडून सुरू असलेली भंडाऱ्यांची उधळण आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या अखंड जयघोषात मिरवणूक पुढे सरकत राहिली. समाजातील आबालवृद्ध डोक्यावर टोपी, कपाळाला भंडारा लावून, गळ्यात स्कार्फ घालून सहभागी झाले होते. आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, महानगरपालिका चौक, ‘सीपीआर’मार्गे आलेल्या मिरवणुकीचा दसरा चौकात समारोप झाला.

या मिरवणुकीत जिल्हा परिषद सदस्य राजेश पाटील, वसंतराव मुळीक, भगवान काटे, नगरसेवक मोहन सालपे, व्यंकाप्पा भोसले, प्रा. शहाजी कांबळे, अ‍ॅड. रणजित गावडे, प्रकाश पुजारी, बयाजी शेळके, राघू हजारे, किशोर घाटगे, छगन नांगरे, बाबूराव बोडके, लिंबाजी हजारे, आनंदा देशिंगे, शिवाजी कारंडे, कृष्णात धोत्रे, राजेश तांबवे, प्रभाकर पाटील, सुवर्णा रानगे, आक्काताई देशिंगे, इंदुमती हजारे, यशोदा हजारे, मनीषा हजारे, इचलकरंजीच्या नगरसेविका सुनीता शेळके, सोनाली अनुसे, बंडोपंत बरगाले, प्रल्हाद देबाजे, आदी सहभागी झाले.

चित्ररथातून इतिहासाचे दर्शनया मिरवणुकीत चित्ररथ सहभागी करण्यात आला होता. त्याद्वारे होळकरशाहीची वैशिष्ट्ये आणि इतिहासाचे दर्शन घडले. त्यामध्ये सतीप्रथा रद्द करणे, प्रजेच्या कल्याणाचे निर्णय, शिक्षण प्रसार, कलकत्ता ते काशी रस्त्याची बांधणी, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेल्या पोलीस चौक्या, होळकर कॉलेजची उभारणी, आदींची माहिती देणाºया फलकांचा समावेश होता. हा चित्ररथ लक्षवेधक ठरला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर