ठळक मुद्देचौकात होर्डिंग, घरावर स्टीकर लावा, जिल्हाधिकारी देसाई यांची सूचनानगरसेवक, तरुण मंडळांशी साधला संवाद
कोल्हापूर : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेची नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करा. चौका-चौकांत होर्डिंग्ज लावावीत. प्रभागातील घराघरांवर स्टीकर्स लावावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी संवाद साधला. जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना
- सर्वेक्षण पथकात मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: किमान अर्धा तास सहभागी व्हावे
- इली आणि सारीचे रुग्ण शोधून त्यांची स्वॅब तपासणी करावी.
- हॉटस्पॉटचे सर्वेक्षण सुरू ठेवावे. पुन्हा-पुन्हा सर्वेक्षण करा.
- एचआरसीटी तपासणी करणाऱ्या लॅबचा ग्रुप करून तपासणी झालेल्यांचा अहवाल मागवून संशयितांचा स्वॅब तपासावा.
- कारखान्याच्या ठिकाणी ह्यनो मास्क, नो वर्कह्ण असे फलक लावा.