इचलकरंजी : उत्तर भारत व राजस्थानमधून वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने शहरात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सोमवारी होलिकोत्सव साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने रंगपंचमी खेळण्यात आली. दरवर्षी मोठ्या प्रमाणात केले जाणारे कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले होते.
पंचरत्न कॉलनी, कापड मार्केट, आवाडे अपार्टमेंट, व्यंकटेशनगर, वसंत कॉलनी, बोहरा मार्केट, कापड मार्केट हौसिंग सोसायटी, आदी भागांत रंगपंचमी साजरी करण्यात आली. काही कॉलनींमध्ये रंगपंचमीऐवजी भजन व कीर्तनाचे कार्यक्रम केले.
दरम्यान, महाराष्ट्रीयन सण धूलिवंदननिमित्त शहर परिसरात लहान मुलांकडून मुख्य रस्त्यांवर अडवणूक सुरू होती. पोलिसांनी गस्त ठेवल्याने सकाळी दोन तासांतच काही ठिकाणी अडवणूक बंद झाली. सूचना देऊनही हुल्लडबाजी करणाऱ्या चौदा ते पंधरा मुलांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले. दरवर्षीपेक्षा धूलिवंदनालाही उत्साह कमी होता.
फोटो ओळी
२९०३२०२१-आयसीएच-०१
२९०३२०२१-आयसीएच-०२
२९०३२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत कापड मार्केट हौसिंग सोसायटीत राजस्थानी मुलांनी तसेच काही महिला-पुरुषांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
२९०३२०२१-आयसीएच-०४
महेश कॉलनीत दरवर्षीच्या मोठ्या कार्यक्रमांना फाटा देत मुलांनी रस्त्यावर रंगपंचमी साजरी केली.
२९०३२०२१-आयसीएच-०५
कापड मार्केटमध्ये मुलांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळली.
सर्व छाया-उत्तम पाटील