शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

मुलांचा घरकामात समावेश करणारी सुटी असावी

By admin | Published: March 30, 2016 11:33 PM

--जुई कुलकर्णी

मुलांना सुटी लागली की त्यांचं मन कुठे रमवावं ? त्यांच्या कोणत्या कलागुणांना वाव द्यावा ? की त्यांना उन्हाळी शिबिरात घालावे, या विचारात पालक असतात. अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ वार्षिक परीक्षा संपल्या की पालकांच्या मनात माजलेला असतो. मुलांच्या सुटीचं नियोजन कसं करावं, यामध्ये पालकांचा कशा प्रकारे सहभाग असावा, याबाबतीत ‘पालक मंच संवेदना’च्या जुई कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद... प्रश्न : सुटीकडे पालकांनी मुलांच्या नजरेतून पाहावे का?उत्तर : सध्याची कुटुंब पद्धती पाहता नोकरदार आई-वडील असतील तर त्यांच्याकडे पर्याय फार कमी असतात. तरीही मुलांच्या कल्पनेतील सुटी कशी असावी, हे जाणून घ्यावे. इतर पालक आपल्या मुलांना कोणत्या तरी शिबिरात घालतात म्हणून आपणही आपल्या पाल्यानेही त्याच शिबिरात जायला हवे, असे बंधन त्याच्यावर लादू नये. नाहीतर हे शिबिर म्हणजे मुलांना दुसरी शाळाच वाटू लागेल. सुटीपूर्वी गणित, भूगोल, विज्ञान, आदी विषयांचा अभ्यास करावा लागायचा. आता इथेही दुसऱ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो आहे, असे वाटू नये.प्रश्न : उन्हाळी शिबिरांचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी फायदा होतो?उत्तर : उन्हाळी शिबिरांचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी फायदा होतोच असे नाही; पण अशी शिबिरे व्यक्तिमत्त्व विकासाला नक्कीच पूरक असतात. अनुभवांची देवाण-घेवाण करणारी शिबिरे मुलांच्या दृष्टीने फायद्याची ठरतात.प्रश्न : शिबिरांमुळे मुलांचे मनसोक्त सुटी एंजॉय करण्याचे स्वातंत्र्य हरवते आहे ?उत्तर : नाही, असे नाही वाटत. पूर्वी मनसोक्त एंजॉय म्हणजे रानावनात भटकणे, सूरपारंब्या खेळणे, सायकल शिकणे, गल्लीत खेळणे अशा गोष्टींसाठी मोकळीक असायची. आता शहरात मोकळी जागा मिळणे शक्य नाही. त्यात पुन्हा सुरक्षिततेचाही विचार करावा लागतो. सध्या छंद वर्ग, संस्कार शिबिरे, समर कॅम्प अशा चार-पाच पर्यायांपैकी एकाची निवड पालकांना किंवा मुलांना करावी लागते. या गोष्टींमधूनही सुटी एंजॉय करता येते.प्रश्न : सुटीत मुलांचे नातेवाइकांकडे, आजोळी जाण्याचे प्रमाण अलीकडे कमी झालंय? उत्तर : हो, हे खरे आहे. अलीकडे पालक आपल्या मुलाला नातेवाइकांकडे पाठवायला तयार नसतात. आजोळी जाण्याचं मुलांचं प्रमाणही कमी झालं आहे. त्यामुळे समवयस्क आतेभाऊ, मामेभाऊ, बहिणी यांच्यामधील मुलांचे शेअरिंग कमी झाले आहे.प्रश्न : ‘सुटी म्हणजे सहलीचेच नियोजन’ अशी धारणा कितपत योग्य वाटते ?उत्तर : सुटी म्हणजे फक्त सहली आयोजित करणे असे समीकरण बनते आहे, हे काही अंशी खरे आहे; पण यामध्ये विदेशातील किंवा महागड्या पर्यटनस्थळांपेक्षा गड-किल्ल्यांचा समावेश असावा. खेडेगावात जाणं असेल, आसपासचे विकासाचे प्रकल्प पाहायला जाणं असेल, निव्वळ डोंगरदऱ्यांत, निसर्गात भटकणे असेल, रानमेव्याचा आस्वाद घेणं असेल, नातेवाईक, मित्रमैत्रिणींचा गट जमवून अशा छोट्या सहली काढल्या, तर त्यातली रंगत अजूनच वाढेल; मग गमतीच्या स्पर्धा, विविध कला-गुणांचं सादरीकरण, अशा गोष्टींनी सहलीचा आनंद अनेकपटींनी वाढेल.प्रश्न : सुटीत मुलांशी संवाद साधण्यासाठी पालकांनी अधिक वेळ देणे गरजेचे असते?उत्तर : संवाद ही कला आहे. पालकांनी वर्षभर मुलांशी संवाद साधायला हवा. मुलांची सुटी आहे म्हणून त्यांच्यासाठी मुद्दाम वेळ काढणे म्हणजे संवादातील कृत्रिमता वाटते. मुलांशी संवाद साधता यावा यासाठी वेगळे काही करतोय, सहली वगैरेंचं नियोजन करतोय, महागडी इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् आणून देतोय असे असू नये.प्रश्न : सुटीचा सदुपयोग कशा प्रकारे करावा?उत्तर : मुलांना व्यावहारिक जीवनाची ओळख करून देण्यासाठी सुटी ही सुसंधी मानावी. मुलांना घरकामात मदत करायला शिकविले पाहिजे. मग भाजी निवडणे, स्वत:चे कपडे स्वत: धुणे, स्वत:चे कपाट नीट लावणे, विजेचे बिल भरायला लावणे, बाजार करणे, आदी गोष्टींमुळे त्यांना परिसराचे ज्ञान मिळते. तसेच एखादा पदार्थ कसा बनवितात याचे प्रात्यक्षिक दाखविणे अशा गोष्टी मुलांना सुटीच्या काळात शिकवाव्यात. त्यांना स्वत:ची जबाबदारी स्वत:च घ्यायला शिकविणे या गोष्टीमुळे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तयार होण्यास मदत होते. जबाबदार नागरिक घडवायचे असतील तर मुलांनाही पालकांच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवायला हवे. मुलांचा दृष्टिकोन विकसित करणे पालकांचे ध्येयच असायला हवे. स्वयंशिस्तीचे धडे देण्यास पालकांनी सुटीच्या काळात प्रयत्न करायला हवेत.प्रश्न : सुटीच्या काळात वाचन संस्कृती जोपासण्याकडे लक्ष द्यायला हवे? उत्तर : सुटीच्या काळातच नाही तर वर्षभर मुलांना अवांतर वाचनाकडे पालकांनी प्रवृत्त करायला हवे. फक्त मुलांना विक तची नवी पुस्तके आणून देणे म्हणजे जबाबदारी संपली असे अनेकांना वाटते; परंतु मुलांना ग्रंथालयाचे सभासद बनविणे, तिथल्या पुस्तकांची यादी पाहणे, शेअरिंगची आवड त्यांच्यात निर्माण करणे, आदी गोष्टींसाठी त्यांना प्रोत्साहित करायला हवे. अलीकडे वाचनाची शिबिरेही भरविली जातात; पण त्या शिबिरातून आपल्या मुलाला नेमका किती फायदा होईल, याचा पालकांनी जागरुकपणे विचार करावा. सातत्यपूर्ण वाचन ही सवय असली पाहिजे. - संतोष तोडकर